मुक्तपीठ टीम
कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलिसांनी बेदम मारले. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज या शेतकरी बांधवाची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले. यावेळी त्यांच्या सोबत आमदार अँड लक्ष्मण पवार व भाजपा पदाधिकारी होते.
लाँकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी ११ पर्यंत बी बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, असा टाहो ठाकरे सरकारच्या नावाने शेतकरी फोडतो आहे.
मराठा आरक्षणा बाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार चार दिवसाच्या बीड आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. आज बीड येथून या दौऱ्याला सुरुवात झाली.