मुक्तपीठ टीम
पंढरपूर कोट्यवधी विठूभक्तांचे श्रद्धास्थान. विठुरायाला नजरेत सामावून पारणे फिटतात. त्याच पंढरीचं सौंदर्य वाढवण्यासाठी आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मांडली आहे. तीर्थक्षेत्र शेगाव मधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये साकारण्याची त्यांची कल्पना आहे. या निमित्तानं प्रत्येकालाच ओढ लागली असेल ती विदर्भातील पंढरपूर आहे तरी कसे ते जाणून घेण्याची. शेगाव हे गजानन महाराजांचं स्थान आहे.
शेगावचा आनंद सागर
• विदर्भातील पंढरपूर म्हणूनही ओळखल्या जाणारे शेगाव हे गजानन महाराजांचं स्थान
• सन १९०८ मध्ये शेगाव येथे गजानन महाराज ट्रस्टची स्थापना झाली.
• आनंद सागर मुख्य मंदिरापासून सुमारे दोन किमी अंतरावर आहे.
• परिसरात पाण्याची कमतरता असल्याने संस्थानाने हा कृत्रिम तलाव घडवला.
• त्यानंतर तिथं उद्यान उभारुन तो बहरवला.
• हे गजानन महाराज ट्रस्टचे बाग, आध्यात्मिक स्थान आणि ध्यान केंद्र देखील आहे.
• ३२५ एकर क्षेत्रात वसलेले आनंद सागर नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं आहे
• सुमारे ५० हजार विविध प्रकारची झाडे, विविध प्रकारची फुले व हजारो वेली आहेत.
• पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला मोठा तलाव ५० एकर क्षेत्रात पसरला आहे.
• तलावाच्या मध्यभागी बेटासारख्या ठिकाणी ध्यान केंद्र बांधले गेले आहे, जे विवेकानंद केंद्राची (कन्याकुमारी) प्रतिकृती आहे.
एकदा आलात की रमूनच जाल…
• एकूणच ते एक अतिशय सुंदर, आकर्षक आणि आध्यात्मिक स्थान आहे, पण मनाला विरंगुळा देणारं बरंच काही इथं आहे.
• मुलांसाठी येथे खेळण्यासाठी स्विंग्स, स्लाइड्स आणि गाड्या आहेत.
• त्या संपूर्ण परिसराचा फेरफटका मारतात.
• याशिवाय येथे संगीत कारंजे, मत्स्यालय, आहेत जी लोकांना आकर्षित करतात.
• संपूर्ण परिसरात फिरण्यासाठी किमान चार तास लागतात.
• चालण्याच्या मार्गाशिवाय ध्यान केंद्रात जाण्यासाठी पाण्याची नौकांचीही व्यवस्था आहे.
• आनंदसागराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देखभालीसाठी घेतली जाणारी मेहनत.
• शेगावचं ते वैशिष्ट्यच आहे, जे गजानन महाराज ट्रस्टचं एक धोरणच म्हटलं पाहिजे.
• बागेच्या स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी संस्थानचा सेवक उपस्थित असतो.
• उद्यानात मोफत पिण्याचे पाणी दिले जाते आणि क्षुधाशांतीचीही योग्य व्यवस्था आहे.