मुक्तपीठ टीम
शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. आज नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी आपले विचार मांडले.
देशात, महाराष्ट्रात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिले आहे. १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे. pic.twitter.com/RLUquFnQJ1
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 12, 2021
आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करतोय. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा पक्ष आहे असेही शरद पवार म्हणाले. लिहिणारे, वाचणारे, अभ्यास करणारे, लिखाण करणारे लोक सध्या फार आहेत. दिनदुबळ्यांचं, पददलितांचं, वंचितांचं दुःख ऐकून आमच्या पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो असेही शरद पवार यांनी सांगितले.
साधारण तुम्ही लक्षात घेतलं तर ५०, ६१, ७५ या तीन टप्प्यावर वाढदिवसाचे कार्यक्रम झाले. पण ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे. pic.twitter.com/jlImDkZHxv
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 12, 2021
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता याची माहितीही त्यांनी दिली. समाजकारण, राजकारण बदलत आहे परंतु महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.
आपल्या भाषणात शरद पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. तर इतर घटनांचा उहापोहही यावेळी केला.
मी ६१ वर्षांचा झालो तेव्हा श्री. भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये स्व. अटलजींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. ७५ वर्षांचा झालो तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि १५ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. pic.twitter.com/iGEcLDdiCk
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 12, 2021
वंचिताचा… महिलांना हक्क मिळवून देणार्या.. कर्मयोग्याचा वाढदिवस – अजित पवार
पवारसाहेबांचा वाढदिवस म्हणजे… वंचिताचा… महिलांना हक्क मिळवून देणार्या… कर्मयोग्याचा वाढदिवस आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवारसाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रत्येक कार्यक्षेत्रावर पवारसाहेबांचा ठसा आहे. या व्यक्तिमत्वाला हिमालयाची उंची आहे. पवारसाहेब आपली प्रेरणा आणि स्फूर्ती आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
ही किमया फक्त पवारसाहेबच करू शकतात – प्रफुल्ल पटेल
दिल्लीत पवारसाहेबांचा ७५ वा वाढदिवस पार पडला त्यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पंतप्रधानांपासून सर्वच लोक आपले राजकीय मतभेद विसरत उपस्थित राहिले होते. एवढ्या लोकांना एका छताखाली आणणे सोपे नाही ही किमया फक्त पवारसाहेब करू शकतात आणि हीच त्यांची खरी कमाई आहे असे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कृषीमंत्री असताना पवारसाहेबांनी जे काम केले त्या कामाची आठवण काढत आजही देशातील शेतकरी पवारसाहेबांकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल – नवाब मलिक
देशात वैचारिक लढाई उभारण्याची गरज असून आपला योध्दा या वैचारिक लढाईत नक्की जिंकेल आणि आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जर सरकार बनत असेल तर देशातही पवारसाहेबांच्या विचारांचे सरकार निर्माण होईल अशी आशाही नवाब मलिक यांनी व्यक्त केली. पवारसाहेबांमुळे माझी ओळख देशात आणि राज्यात निर्माण झाली असल्याची प्रामाणिक कबुलीही नवाब मलिक यांनी दिली.
पवारसाहेब आपल्याला एक संघर्ष तयार करायला हवा. देशातील जनता आपल्याकडे आशेने बघत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. महाराष्ट्रात समतामुलक समाज निर्माण व्हावा या विचाराचे पवारसाहेब आहेत. तुम्ही योध्दा आहात तुम्हीच हे चक्रव्यूह भेदू शकता असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
ओबीसी आरक्षणाला विरोध करणार्यांना येत्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करा – छगन भुजबळ
या देशातील सर्व आरक्षण संपवण्याचा विचार रुजत आहे. जे या आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांना येत्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करा असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात जो चमत्कार केलात तोच चमत्कार येत्या २०२४ मध्ये दिल्लीत करा असे आवाहनही छगन भुजबळ यांनी पवारसाहेबांना केले. यावेळी एनसीपी अॅपचे उद्घाटन शरद पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी आपले विचार मांडले.
पवारसाहेब व प्रतिभाताई पवार यांचा एकत्रित सत्कार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतील ‘शरद पवार माझ्या शब्दात’ या निबंध पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. यावेळी साहेबांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार, प्रतिभाताई पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,खासदार डॉ. अमोल कोल्हे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी खासदार माजिद मेमन, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सामाजिक सेलचे जयदेव गायकवाड, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, मनपाच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.