मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यामागे शिवसेनेतील बंडखोरीनंतरचा पक्ष हायजॅकिंगच्या होत असलेला प्रयत्न असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी त्या पत्रामध्ये त्यांनी शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि समित्या बरखास्त केल्याची माहिती दिली आहे.
हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे, याचं कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेलं नसलं तरी शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतरचे परिणाम हे कारण असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतात. भाजपाच्या पाठबळावर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची सरकारमधील सत्ता हिसकावून घेतल्यानंतर आता ते पक्षाची सत्ताही हिसकावत त्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी भाजपाच्या मदतीनं आधी विधानसभा आणि नंतर संसदेतही आपल्या गटाला अधिकृत पक्ष अशी मान्यता मिळवली. आता निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून ते मुख्य पक्षही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेला लागलेली जबर ठेच राष्ट्रवादी काँग्रेसने वेळीच सावधगिरी बाळगण्याची शहाणपणाची भूमिका घेतली असावी.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि समित्या बरखास्त!
- सध्या सोशल मीडियावर प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचे पत्र व्हायरल होत आहे. त्यात पक्षाचे सर्व विभाग आणि समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
- पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
- त्यानंतर प्रफुल पटेल यांनी ट्वीट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय.
- त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी सांगितलं.
- विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
With the approval of our National President Hon’ble Shri Sharad Pawar Saheb, all the National level Departments and Cells of @NCPspeaks excluding Nationalist Women’s Congress, Nationalist Youth Congress and Nationalist Students Congress stand dissolved with immediate effect.
— Praful Patel (@praful_patel) July 20, 2022