Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शरद पवार सर्वच विषयांवर बोलले…सचिन वाझेंवर मात्र टाळले!

March 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sharad pawar

मुक्तपीठ टीम

“लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही,” अशा कडक शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी वाट्टेल ते बोलणारे भाजपा खासदार साक्षी महाराजांचीही दखल घेतली. आसाम, बंगाल, तामिळनाडू या राज्यांमधील निवडणुकांवरही भाष्य केले. शेतकऱ्यांप्रमाणे संसदही अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले. पण नेमका सध्या गाजत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा विषय आल्यावर ते काहीच बोलले नाहीत. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे बोलून त्यांनी प्रतिक्रिया टाळली.

शरद पवार यांनी पुढील महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले:

मुद्दा -१: राज्यपाल

जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

बारामती येथे आज पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले.

आमची अपेक्षा अशी होती की मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले.

मुद्दा -२: साक्षी महाराज

बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असलेल्या लोकांवर काय भाष्य करावं – शरद पवार

काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

बारामती येथे पत्रकारांनी भाजपच्या साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विचारणा केली असता शरद पवार यांनी त्यांचं नांव न घेता चांगलाच समाचार घेतला.

बेजबाबदारपणे बोलण्याचं काही लोकांचं वैशिष्ट्य असतं. कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत शरद पवार यांनी लगावला.

मुद्दा -३: शेतकरी आंदोलन

शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी संसदही अस्वस्थ आहे – शरद पवार
कृषी कायद्यासंदर्भाच्या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी संसदही अस्वस्थ आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उद्या संसदेत उमटली तर चुकीचे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

शेतकरी आंदोलनाला १०० दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्रसरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे उद्या (सोमवारी) काय होतेय हे पहावे लागेल असेही शरद पवार म्हणाले.

मुद्दा -४: पाच राज्यांमधील निवडणुका

आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड आहे – शरद पवार

पाच राज्यांच्या निवडणूकांवर शरद पवार यांचे मोठे विधान…
आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी पाच राज्यातील निवडणूकांवर फार मोठे विधान केले आहे.

पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही असेही शरद पवार म्हणाले.

तामिळनाडूमध्ये आजची परिस्थिती लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्याबाजुने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आसाममध्ये भाजपाचे राज्य आहे. त्यांची तुलनात्मक स्थिती चांगली आहे. त्यामुळे हे एक राज्य वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल असेही शरद पवार म्हणाले.


Tags: bhagat singh koshyarisharad pawarराज्यपाल भगतसिंह कोश्यारीशरद पवारशेतकरी आंदोलन
Previous Post

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा खासदार डेलकरांचे प्राण वाचवू शकले असते !: सचिन सावंत

Next Post

वाझेंना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी, तपास अधिकारीच झाले आरोपी!

Next Post
sachin waze

वाझेंना २५ तारखेपर्यंत एनआयए कोठडी, तपास अधिकारीच झाले आरोपी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!