मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. नागपूर येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी संबोधित करताना शरद पवारांना माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची उणीव जाणवली. देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असं म्हटलं. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस देशमुखांच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे.
काय म्हणाले शरद पवार?
- गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत.
- अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
- केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे.
- या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे.
- काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय.
- अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय.
- वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय.
- मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
- अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही.
- शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला.
पवारांचा भाजपवर निशाणा
- तसंच राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे.
- परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत.
- खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत.
- सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत.
- ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात.
- संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस बजावली.
- अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही.
- म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं.
- अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते.
- हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात.
- महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही.
- म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो.
- तुम्ही कितीही त्रास द्या.
- सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही.
- जनता आज ना उद्या वसूल करेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना व्याजासकट अद्दल घडवतील
- सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायचे असतात.
- पाय जमिनीवर नसले, त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना व्याजासकट अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत.
- मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही.
- उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन करत आहेत.
- केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे.
- त्याचबरोबर आगामी विधानसभा आणि महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू.
अनिल देशमुखांना पुन्हा त्यांच्याच जागी बसवायचं आहे – प्रफुल्ल पटेल
- महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं.
- हे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील.
- पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे.
- पवार साहेबांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.
- आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल बापूला परत या त्यांच्या जागेवर बसवायचं आहे.
- हे पवार साहेबांचे विचार आहेत.
- माझ्या एकट्याचे नाहीत.
- म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झालीये.