Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

“पाणलोट विकास घटक २.० योजना राज्यात राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करावे” – मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

February 9, 2022
in सरकारी बातम्या
1
Shankarrao Gadakh instruction for implementation of WDC 2.0 scheme

मुक्तपीठ टीम

प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० योजना राज्यात राबविणेबाबत कोटेकोर नियोजन करण्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी  निर्देश दिले.

 

मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची (२.०) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

 

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण ६० : ४० आहे. मृदेची धूप कमी करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून सन २०२२ पासून अंमलबजावणी सुरु होत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एकूण ३० जिल्हयांमध्ये राबविला जाणार असून मंजूर प्रकल्प संख्या १४४ आहे. कार्यक्रमाद्वारे एकूण ५.६५ लक्ष हेक्टर क्षेत्रावर उपचार केले जाणार असून प्रकल्प मुल्य रु.१३३३.५६ कोटी (५ वर्षासाठी) आहे.

 

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास २.० या योजनेच्या मुलस्थानी मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांवर, उताराला आडवी पेरणी, मिश्र पिक पद्धत, मृतसरी काढणे, रुंद सरी – वरंबा पध्दतीने पेरणी, बांधबंदिस्ती, गॅबियन बंधारे इ. उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश शंकरराव गडाख यांनी दिले. तसेच क्षमता उपचार नकाशाचा वापर करुन तांत्रिकदृष्ट्या सुयोग्य कामांची निवड करुन अंमलबजावणी करणे, जलशक्ती अभियानाशी सांगड घालून पावसाच्या पाण्याचे साठवण, पुनर्भरण, पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन व पुनर्वापरावर भर देणे, उपलब्ध पाण्याच्या सुक्ष्म सिंचनाद्वारे कार्यक्षम वापरावर भर देऊन सिचंन क्षेत्रात वाढ होईल याबाबत विभागाने सुयोग्य नियोजन करण्याबाबतच्या सूचना शंकरराव गडाख यांनी दिल्या. 

 

महिलांच्या बचतगट बळकटीस सहाय्य, लोकसहभाग व पाणलोट समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे कामकाज होण्याकडे विभागाने लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

प्रकल्पाच्या गुणवत्तापूर्वक व जलद कार्यान्वयनाकरिता राज्यस्तरीय व प्रकल्पस्तरीय नोडल यंत्रणेच्या बळकटीकरणाबाबत शंकरराव गडाख यांनी विभागास निर्देश दिले. या बैठकीस जलसंधारण विभागाचे सह सचिव, सु.कि.गावडे, संचालक, प्रधानमंत्री कृषि सिंचना योजना शिरोदे उपस्थित होते.


Tags: Minister Shankarrao GadakhPradhan Mantri Krishi Sinchan YojanaWatershed Development Component 2.0 Schemeपाणलोट विकास घटक २.० योजनाप्रधान मंत्री कृषि सिंचन योजनामंत्री शंकरराव गडाख
Previous Post

राष्ट्रवादीचा भाजपावर ट्वीट हल्ला: “चुनावजीवी…थापांची पुडी सोडूया!”

Next Post

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या कायम पुनर्वसनाकरिता निधी मंजूर – विजय वडेट्टीवार

Next Post
Raigad Collapsed

रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या कायम पुनर्वसनाकरिता निधी मंजूर - विजय वडेट्टीवार

Comments 1

  1. pravin pramod joshi. says:
    3 years ago

    केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत तालुका कृषि कार्यालय अधिनस्त प्रकल्प 2012-13 मध्ये कृषि तज्ञ या पदावर आम्ही गेली 8 वर्ष काम केले आहे. कामाच्या जबाबदारीत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, ऊपजिवीका प्रकल्प अहवाल तयार करणे कामे आम्ही केली आहेत. यामध्ये पूर्वतयारीचा टप्पा, कामाचा टप्पा, व एकत्रीकरण टप्पा यशस्वीरित्या पुर्ण केला आहे.
    प्रेरक प्रवेश ऊपक्रम कामे, क्षमता बांधणी कामे सुरुवातीला केली असून , मृदं व जल संवर्धनाची कामे करताना कृषि/फलोत्पादन/वनीकरण क्षेत्रावर कामे करताना त्यांचे इस्टीमेटसाठी मदत करणे, गुगलवरुन मापे घेणे, भाग नकाशे काढणे, प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांची मापे घेणे, जिओ टॅगींग करणे, त्याची नोंद एम,बी रेकॉर्डींग वर घेणे, PFMS या प्रणालीवर online बिले तयार करणेची कामे करणे. त्याचे दस्ताऐवज ठेवणे. कामाचे ऑडीट करुन घेणे.
    तसेच त्यामध्ये ऊपचार निहाय गटांची स्थापना करणे, गटांचे दस्तावेज ठेवणेसाठी व मिटीग बाबत कामाचे नियोजन करणे. गटांचे मूल्यमापन करुन बचत गटाच्या फिरता निधीचे बिझनेस प्लाॅन तयार करुन निधी वितरीत करणे. तसेच व्यवसाय मार्गदर्शन करुन व्यवसाय वाढीस चालना देणे. व त्याची मासीक अहवालात नोंद घेऊन MIS पोर्टल वर त्याची नोंद करणे. ऊपजिवीका कृषि आराखड्यातील कृषि विषयक निधीच्या वापराचे नियोजन करुन प्रकल्प विषयक लाभार्थी निकषाप्रमाणे निवड व प्रस्ताव तयार करणे. त्याचे मूल्यांकन करणे व प्रत्यक्ष निवड करणे इत्यादी कामे प्रभावीपणे राबविली आहेत.
    तसेच आमचे पाणलोट विकास घटकावर अधारीत 52 दिवसांचे प्रशिक्षण परिपूर्ण झाले आहे.
    तरी सध्या नव्याने चालु होत असलेल्या पाणलोट प्रकल्पामध्ये आपण आमची कृषि तज्ञ व ऊपजिवीका तज्ञ म्हणुन जलसंधारण विभागाकडे शिफारस करावी अशी मी आपणाकडे विनंती करीत आहे.

    1) श्री. प्रविण प्रमोद जोशी – कृषि तज्ञ
    9420958953/9112888023
    joshipravin37@yahoo.com

    2) श्री. स्वप्निल सुंदर शेडगे – कृषि तज्ञ
    8668456573/9420958849
    swapnilshedage30@gmail.com

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!