Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शक्ती मिल बलात्कार: नराधमांची फाशीची शिक्षा रद्द! आता जन्मठेप!! असं होतं देशाला हादरवणारं प्रकरण…

२०१३मधील सामूहिक बलात्कार प्रकरणात २०१४मध्ये झालेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने जन्मठेपेत बदलली

November 25, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Shakti Mills Gang Rape Case

मुक्तपीठ टीम

मुंबईतील शक्ती मिलच्या ओसाड पडीक वास्तूत एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन नराधमांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने बदलली आहे. २०१३मधील या अमानूष गुन्ह्यातील आरोपींना २०१४मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने त्या तिन्ही नराधमांच्या फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

काय आहे नेमकं प्रकरण?

  • ही घटना २२ ऑगस्ट २०१३ मध्ये घडली होती.
  • एक महिला फोटो पत्रकार शक्ती मिल कंपाऊंडमध्ये तिच्या एका सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती.
  • वास्तविक, महालक्ष्मी परिसरात वर्षानुवर्षे ही मिल बंद होते.
  • त्या दिवशी संध्याकाळचे ६ वाजले होते.
  • महिला पत्रकार आणि तिचा साथीदार तेथे पोहोचल्यावर तेथे उपस्थित काही लोकांनी पोलीस असल्याचे सांगत त्यांना फोटो काढण्यापासून रोखले.
  • ते लोक म्हणाले की आधी तुम्ही आमच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्या आणि मग फोटो काढा.
  • त्यानंतर त्यांनी महिला पत्रकार आणि तिच्या साथीदाराला आत घेतले.
  • त्यांना आत घेऊन दोघांवरही हल्ला करून तेथील महिला पत्रकाराच्या साथीदाराला बांधून ठेवले.
  • त्यानंतर महिला पत्रकारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला.

 

७२ तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले

  • दोन तासांनंतर दोघेही कसेबसे जीव वाचवून रुग्णालयात पोहोचले.
  • रुग्णालयातील डॉक्टरांना मुलीची स्थिती पाहताच त्यांना संपूर्ण प्रकरण समजले.
  • डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.
  • महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराची बातमी ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
  • त्यानंतर लगेचच अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
  • ७२ तासांत पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले.

 

चौकशीदरम्यान आणखी एक सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर

  • प्रत्यक्षात या आरोपींना अटक केल्यानंतर काही दिवसांनी कॉल सेंटरमध्ये काम करणारी टेलिफोन ऑपरेटरने तिच्यावर यातील ३ तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोपही केला.
  • ३१ जुलै २०१३ रोजी शक्ती मिल परिसरातच यातील तीन तरुणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले.
    त्यादरम्यान त्यांना मारहाणही करण्यात आली.
  • या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये अटक केलेल्या पाच आरोपींविरुद्ध ३६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.
  • या दोन्ही सामूहिक बलात्कार प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पीडितांच्या वतीने युक्तिवाद केला, त्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले.

पॉर्न चित्रपट पाहून पीडितेचा शोध घेत असत

  • अटक आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबानीवरून हे सर्वजण सेक्सचे वेडे होते आणि शिकार शोधत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • मदनपुरा, भायखळा आणि आग्रीपाडा येथे नियमितपणे पॉर्न फिल्म पाहत असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते.
  • याशिवाय ते रेड लाईट एरियात फिरत असे.
  • आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि अल्पवयीन यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते अनेकदा पॉर्न पाहण्यासाठी जात असत.

नराधमाला नव्हता पश्चाताप

  • पत्रकारावर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांमधील अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याचा पश्चाताप न करता रात्री पाव भाजी खाल्ली होती.
  • तीन तासांपूर्वी त्याने एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे त्याच्या वागण्यातून अजिबात वाटत नव्हते.
  • त्यामुळे या पाचपैकी तीन आरोपींनी पुन्हा बलात्कारासारखा गुन्हा केला असल्याने सत्र न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा दिली होती.
  • उच्च न्यायालयाने या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत ती जन्मठेपेवर आणली आहे.

Tags: mumbaimumbai high courtShakti MillsShakti Mills Gang Rape Caseमुंबईमुंबई उच्च न्यायालयशक्ती मिलशक्ती मिल बलात्कार प्रकरण
Previous Post

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

Next Post

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ७३२ कोटी रूपये वितरीत – विजय वडेट्टीवार

Next Post
Vijay Vadettiwar

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ७३२ कोटी रूपये वितरीत - विजय वडेट्टीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!