मुक्तपीठ टीम
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आपल्या चित्रपटांसोबत आपल्या आयपीएलमधील क्रिकेट टीम केकेआरमुळेही नेहमीत चर्चेत असतो. नुकताच मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांत सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने केसेआरचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर शाहरुखने आपल्या संघाचे मनोबल वाढविण्यासाठी खास ट्विट केले आहे. सध्या सोशल मीडियावर या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
किंग खानच्या ट्विटमध्ये काय?
“आज रात्री कोलकाता नाईट रायडर्स बॅकसीटवर येऊ शकते. मला वाटते संघांनी चांगली कामगिरी केली (जर आपण फलंदाजांच खेळ विसरु शकलो तर!!). वेल डनबॉईज…दिनेश कार्तिक आणि रसेल प्रयत्न करतात आणि त्याला एक सवय बनवून घेतात…आम्ही परत येऊ!!”, असे शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच हे ट्विट त्याच्या चाहत्यांना खूपच आवडले असून त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.
Coulda…woulda…shoulda can take a backseat tonight…@KKRiders was quite awesome I feel. ( oops if we can forget the batting power play!!) well done boys…@Russell12A @patcummins30 @DineshKarthik try and make this a habit…we will be back!! pic.twitter.com/B1wGBe14n3
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 21, 2021
केकेआरला दुहेरी फटका
- केकेआरचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने आणि आयपीएलच्या आयोजकांनी कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मोर्गनला भारी भक्कम दंड लावले आहे.
- केकेआरला वेळेत २० ओवर पूर्ण करता आले नाहीत त्यामुळे स्लो ओवर रेटच्या कारणास्तव कर्णधार इयोन मोर्गनला १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.