पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. ही आगा आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या संपूर्ण देशासह जगाचे लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागले असतानाच ही आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे.
आगीनंतरच्या प्रतिक्रिया
“आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जावे. तुम्ही दाखवलेली काळजी आणि प्रार्थनांसाठी आपले आभार. सध्याच्या घडीला आगीत काही मजले नष्ट झाले आहेत. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे, असे ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केले आहे.
Thank you everyone for your concern and prayers. So far the most important thing is that there have been no lives lost or major injuries due to the fire, despite a few floors being destroyed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
या घडनेची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट केले आहे. “सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या इमारतीमध्ये आग लागण्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. राज्याच्या यंत्रणेला देखील निर्देश दिले असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आग संपूर्णपणे विझवण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येत आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray is in touch with the Pune Municipal Commissioner and is taking complete on-ground updates. He has directed the state machinery to coordinate and ensure that the situation is under control. https://t.co/NlcVtf33TG
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 21, 2021
पुण्याच्या पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया
“आतापर्यंत सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेले आहे, कोणीही अडकलेलं नाही. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी अपेक्षा आहे. इमारतीत कोणतंही उत्पादन होत नव्हतं असे सीरमने आम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी कोव्हिशिल्डची कोणतीही निर्मिती होत नव्हती,” अशी माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
अजित पवार यांची प्रतिक्रिया
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग विझवणे आणि सोबतच हानी टाळणे याला प्राधान्य आहे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.