Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये ‘बनी’!

‘फोर्थ स्मिथ’, ‘माद्रिद’, ‘सिनेमेकिंग’, ‘अयोध्या’, ‘के. आसिफ’, ‘गंधार’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये 'बनी'ची निवड!

July 24, 2022
in featured, चांगल्या बातम्या, मस्तच
0
bunny films

मुक्तपीठ टीम

निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित – दिग्दर्शित ‘बनी’ या चित्रपटाचा फर्स्टलूक ‘७५व्या ‘कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये ‘बनी’च्या प्रवेशिका सादर करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी ढाका येथील प्रसिद्ध ‘सिनेमेकिंग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ निवड झाल्यानंतर स्पेन येथील जगप्रसिद्ध ‘माद्रिद’ आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी या चित्रपटाची निवड झाली. त्यापाठोपाठ अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि नुकतेच जाहीर झालेल्या ‘के आसिफ’, ‘अयोध्या’, ‘गंधार इंडिपेंडेंट’ चित्रपट महोत्सवासाठी ‘बनी’ची निवड झाली असून आपल्या पहिल्याच चित्रपट निर्मितीला मिळालेले भरघोस यश सर्व तंत्रज्ञ कलावंतांच्या अथक परिश्रमाचे द्योतक आहे, असे निर्माते शंकर धुरी यांनी म्हटले आहे.

विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतू त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे.

अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय मांडण्यात आला आहे.दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने हुबेहूब दाखविण्याचे कसब डीओपी कार्तिक काटकर बिनीच्या कलावंताने लीलया पेलल आहे. निर्माता, लेखक-दिग्दर्शक आणि डीओपी या त्रिसूत्रीने बनी चित्रपट निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करताना आपलं नवखंपण कुठेही जाणवू दिलं नाही.

बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे. आकर्षक कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं असून सुस्पष्ट साउंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. बनीचं रहस्य गडद करणारं संकलन योगेश भट्ट याचं असून त्यावर उत्कंठा ताणणारं साजेसं पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे. स्थिरचित्रण निखील नागझरकर यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन विशाल पाटील, सुनील जाधव याचं आहे. वेशभूषाकार पल्लवी दळवी, केशभूषा प्रफुल्ल कांबळे, स्वाती थोरात, वॉर्डड्रॉप महादेव शिंदे आणि रंगभूषाकार ललित कुलकर्णी यांनी यातील व्यक्तिरेखांना सजवण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. डीआय हितेंद्र परब तर प्रोमो डिझाईन पंकज सपकाळे यांनी केले आहेत. निर्मिती कार्यात कार्यकारी निर्माता दिगंबर बोईवार, लाईन प्रोडूसर विजय देवकर, निर्मिती सूत्रधार महादेव शिंदे, यासीन आली यांनी महत्वाचे कार्य केले आहे. चित्रपटाची प्रसिद्धी डिझाईन्स सचिन डागवाले, सोशल मीडिया मॅनॅजमेन्ट समीर भोसले, फेस्टिव्हल कॉर्डीनेशन मोहन दास यांचे आहे.


Tags: bunny filmsdomestic and foreign film festivalsgood newsmuktpeethचांगली बातमीदेश-विदेशातील चित्रपट महोत्सवबनी चित्रपटमस्तचमुक्तपीठ
Previous Post

आता ७० मीटरहून उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बसवणे सक्तीचे!

Next Post

नारी शक्ती पुरस्कार-२०२२ साठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मागवल्या प्रवेशिका

Next Post
नारी शक्ती पुरस्कार-२०२२

नारी शक्ती पुरस्कार-२०२२ साठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने मागवल्या प्रवेशिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!