Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

दिल्लीला जाताय? हातमागावर विणलेल्या ७५ प्रकारच्या साड्यांच्या विरासत महोत्सवाला नक्की भेट द्या!

January 4, 2023
in featured, चांगल्या बातम्या
0
Virasaat

मुक्तपीठ टीम

नवी दिल्लीत जनपथ येथील हॅन्डलूम हाट येथे आयोजित “विरासत” या साडी महोत्सवाचा दुसरा टप्पा ३ ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू होईल

वस्त्रोद्योग मंत्रालय या महोत्सवाचे आयोजन करत असून प्रदर्शनाला भेट देण्यासाठी  सकाळी ११ ते रात्री ८ अशी वेळ आहे.

दुसऱ्या टप्प्यात देशातील विविध भागातील ९० हून अधिक विणकरांचा सहभाग असून  टाय आणि डाई, चिकन एम्ब्रॉयडरी साड्या, हँडब्लॉक साड्या, कलमकारी मुद्रित साड्या, अजराख, कांठा आणि फुलकरी यासारख्या हस्तकला केलेल्या प्रसिद्ध साड्यांचे प्रकार यात पहायला मिळतील. यामध्ये खास हातमाग साड्यांव्यतिरिक्त जामदानी, इकत, पोचमपल्ली, बनारस ब्रोकेड, टसर सिल्क (चंपा), बलुचारी, भागलपुरी सिल्क, टांगेल, चंदेरी, ललितपुरी, पटोला, पैठणी इत्यादी साड्या देखील असतील. याशिवाय तंचोई, जंगला, कोटा डोरिया, कटवर्क, माहेश्वरी, भुजोडी, संतीपुरी, बोमकाई आणि गरड कोरियाल, खंडुआ आणि आर्नी सिल्क साड्या यांसारख्या हॅण्डलूम साड्या देखील उपलब्ध असतील.  ‘विरासत,  हाताने विणलेल्या  ७५ भारतीय साड्यांचा उत्सव ‘, या हातमागावर विणलेल्या साड्यांच्या महोत्सवाचा पहिला टप्पा १६ डिसेंबर रोजी सुरू होऊन ३० डिसेंबर २०२२ रोजी त्याची सांगता झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आणि राज्यमंत्रीदर्शना जरदोश आणि इतर महिला खासदारांच्या उपस्थितीत १६ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते.

१६ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या टप्प्यात ७० स्पर्धकांनी “विरासत” मध्ये भाग घेतला. वृत्तपत्रे, पोस्टर्स, निमंत्रण पत्रिका समाज माध्यमं, मुद्रित माध्यमं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि डिझायनर्स कार्यशाळा इत्यादींद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यासाठी व्यापक प्रचार कार्यक्रम हाती घेण्यात आला.  हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला आणि त्याला बहुतेक प्रत्येक वयोगटातील लोकांचा सहभाग मिळाला. याशिवाय या क्षेत्राकडे आवश्यक ते लक्ष वेधले गेले आणि हातमागाच्या वस्तूंच्या विक्रीमुळे विणकरांसाठी देखील तो लाभदायी ठरला.

आपल्या हातमाग विणकरांना पाठिंबा देण्यासाठी #MySariMyPride या सामायिक हॅशटॅग अंतर्गत समाजमाध्यमांवर एक मोहीम सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अनुषंगाने, “ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त” ७५ हातमाग विणकरांच्या हातमाग साड्यांचे प्रदर्शन-आणि-विक्रीचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांसाठी अनेक उपक्रमांची योजना आखण्यात आली आहे जसे की:

  • विरासत- वारसा साजरा करणे: जतन केलेल्या हातमाग साड्यांचे प्रदर्शन.
  • विरासत-एक धरोहर: विणकरांकडून साड्यांची थेट किरकोळ विक्री.
  • विरासत के धागे : हातमागाचे थेट प्रात्यक्षिक
  • विरासत-कल से कल तक: साडी आणि साड्यांचा टिकाऊपणा याबाबत चर्चा आणि कार्यशाळा.
  • विरासत-नृत्य संस्कृती: भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध लोकनृत्य.

सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. भारतातील काही अनोख्या ठिकाणांहून आणलेल्या हातमागाच्या साड्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यांची एक संक्षिप्त यादी खाली दिली आहे: –

 

States Prominent sari varieties
Andhra Pradesh Uppada Jamdhani Sari, Venkatagiri Jamdani Cotton Sari, Kuppadam Sari, Chirala Silk Cotton Sari, Madhavaram Sari and Polavaram Sari
Kerala Balaramapuram Sari and Kasavu Sari
Telengana Pochampally Sari, Siddipet Gollabamma Sari and Narayanpet Sari
Tamilnadu Kancheepuram Silk Sari, Arni Silk Saris, Thirubuvanam Silk Sari, Vilandai Cotton Sari, Madurai Sari, Paramakudi Cotton Sari, Aruppukottai Cotton Sari, Dindigul Cotton Sari, Coimbatore Cotton Sari, Salem Silk Sari and Coimbatore (Soft) Silk Saris & Kovai Kora Cotton Saris
Maharashtra Paithani Sari, Karvath Kathi Sari and Nagpur Cotton Sari
Chhattisgarh Tussar Silk Sari of Champa
Madhya Pardesh Maheshwari Sari and Chanderi Sari
Gujarat Patola Sari, Tangaliya Sari, Ashawali sari and Kuchchi Sari/ Bhujodi sari
Rajsthan Kota Doria Sari
Uttar Pradesh Lalitpuri Sari, Banaras Brocade, Jangla, Tanchoi, Cutwork, and Jamdani
Jammu & Kashmir Pashmina Sari
Bihar Bhagalpuri Silk Sari and Bawan Buti Sari
Odisha Kotpad Sari and Gopalpur Tassar  Sari
West Bengal Jamdani, Santipuri and Tangail
Jharkhand Tussar and Gichha Silk Sari
Karnataka Ilkal Sari
Assam Muga Silk Sari, Mekhla Chadar (Sari)
Punjab Embd. & Croch (Phulkari)

या कार्यक्रमामुळे साडी विणण्याच्या जुन्या परंपरेवर पुन्हा लक्ष केंद्रित केले जाईल आणि त्याद्वारे हातमागावर काम करणाऱ्या समुदायाची कमाई सुधारेल.

हातमाग क्षेत्र हे आपल्या देशाच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, याशिवाय मोठ्या संख्येने लोकांना, विशेषत: महिलांना रोजगार देणारे हे प्रमुख क्षेत्र आहे. हा कार्यक्रम हातमाग क्षेत्राची परंपरा आणि क्षमता या दोन्हींचा उत्सव पूर्ण ताकदीने साजरा करेल.


Tags: delhigood newsGood news MorningSaree MahotsavViraasatगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगदिल्लीविरासत महोत्सव
Previous Post

आजपासून घुमणार “मराठी तितुका मेळवावा”चा गजर! जाणून घ्या विश्व मराठी संमेलनात काय घडणार?

Next Post

२०२२: रेल्वेला प्रवाशांकडून ४८ हजार ९१३ कोटींचं उत्पन्न, ७१% वाढ!

Next Post
Indian Railway

२०२२: रेल्वेला प्रवाशांकडून ४८ हजार ९१३ कोटींचं उत्पन्न, ७१% वाढ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!