मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलासाठी संहारक नौकांची निर्मिती करणा-या ‘माझगाव गोदी’ने द्वितीय श्रेणीतील ‘मोरमुगाव’ही विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक रुजू करण्यात आली. नौदलाला देण्यात आलेली ही दुसरी नौका आहे.

नौदलासाठी खास असलेल्या प्रकल्प १५ बी वर्गातील ही दिशादर्शक ‘गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ म्हणजेच यार्ड १२७०५ मोरमुगाव आहे. भारतीय नौदलाचे माजी व्हाईस अॅडमिरल आणि एमडीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नारायण प्रसाद यांनी नौका स्वीकृती दस्तऐवजावर स्वाक्षरी केली होती. माझगाव गोदीचे सीएसओ (तांत्रिक) रिअर अॅडमिरल (निवृत्त) सी. रघुराम आणि कॅप्टन कपित भाटीया यावेळी उपस्थित होते. ही नौका स्वदेशी पोलाद डीएमआर २४९ए वापरून बांधली गेली आहे. भारतात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठी विनाशिकेची एकूण लांबी १६४ मीटर्स आणि ७ हजार ५०० टन वजनाची आहे. ही नौका नौदलासाठी एक सक्षम आणि शक्तिशाली व्यासपीठ आहे. नौदलासाठी आवश्यक असलेली विविध कार्ये आणि मोहिमा, सागरी युद्धाच्या दृष्टीनेही संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये पसरलेले आहे. या नौकेवर सुपरसॉनिक सरफेस टू सरफेस ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे आणि ‘बराक-8’ पृष्ठभाग ते हवाई क्षेपणास्त्रे याशिवाय समुद्राखालील युद्ध क्षमतेच्या दिशेने सक्षम असून विनाशककारक आहे.

या नौकेवर स्वदेशी विकसित पाणबुडीविरोधी शस्त्रे आणि सेन्सर्स, हल माउंटेड सोनार हम्सा एनजी, जड वजनाचे टॉपेर्डो ट्यूब लाँचर्स आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर्स आहेत. ही नौका लक्षणीय अधिक बहुमुखी असल्यामुळे नौदलाच्या यादीतील ही फ्रिगेट म्हणजे शत्रूविरूद्ध मुरगावची अष्टपैलू क्षमता आहे. पाणबुड्या, पृष्ठभागावरील युद्धनौका, शत्रुंच्या नौकांविरोधी क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांमुळे ही नौका सक्षम आहे.

ही नौका ३१२ सैनिक आणि अधिकारी यांंचा क्रू सामावून घेऊ शकतो. तिचा पल्ला ४००० नॉटीकल मैल इतका आहे विस्तारित मिशन वेळेसह ठराविक ४२ दिवसांची मोहिम पार पाडू शकते. युद्ध क्षेत्राबाहेरील आॅपरेशनमध्ये पुढे जाण्यासाठी नौकेवर दोन हेलिकॉप्टर आहेत. आयएनएस विशाखापट्टणम ही पहिली नौका गेल्या वर्षी २१ रोजी कार्यान्वित झाली होती. तिसरी नौका इंफाळचे जलावतरण २० ए्प्रिल २०१९ रोजी आणि चौथी नौका ‘सुरत’चे १७ मे २०२२ रोजी जलावरण झाले. माझगाव गोदीकडून भारतीय नौदलासाठी स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुडी बांधण्याचा इतिहास जवळजवळ नकाशावर तयार केला आहे . ‘युद्धनौका आणि पाणबुडी बिल्डर्स’ला योग्य रीतीने त्याचे मुल्य वाढलेले आहे.