मुक्तपीठ टीम
केंद्र शासनाच्या न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत ADIP (Assistance to Disabled person Scheme) योजना राबविण्यात येत असून ADIP योजनेंतर्गत यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असून, नोंदणीकृत व नव्याने नोंदणी होणाऱ्या दिव्यांग लाभार्थींना गरजेनुसार कृत्रिम अवयव व साधने उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सांगली मार्फत पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व दिव्यांगानी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
दिव्यांगासाठी पूर्व तपासणी शिबिराचा तालुकानिहाय आयोजनाचा दिनांक व ठिकाण पुढीलप्रमाणे
- शिराळा – दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी विश्वासराव नाईक आर्ट कॉमर्स ॲन्ड बाबानाईक सायन्स महाविद्यालय शिराळा
- वाळवा – दि. २९ डिसेंबर २०२२ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर. पलूस – दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी आर्ट कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालय पलूस
- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका – दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी व्ही. पी. इन्टी. ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड स्टडीज सांगली
- मिरज ग्रामीण – दि.१ जानेवारी २०२३ रोजी व्ही. पी. इन्टी. ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲन्ड स्टडीज सांगली
- कवठेमहांकाळ – दि.२ जानेवारी २०२३ रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमहांकाळ जत – दि. ३ जानेवारी २०२३
- रोजी सिध्दार्थ पॉलिटेक्नीक जत आटपाडी – दि.४ जानेवारी २०२३ रोजी श्रीमंत बाबासाहेब देशमुख, कॉलेज तहसिल कार्यालयाजवळ आटपाडी
- तासगाव – दि.५ जानेवारी २०२३ रोजी पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव
- खानापूर (विटा) – दि.६ जानेवारी २०२३ रोजी आदर्श महाविद्यालय विटा ता. खानापूर जि. सांगली बळवंत महाविद्यालय विटा
- कडेगाव – दि.७ जानेवारी २०२३ रोजी लोकनेते मोहनराव कदम ऑफ ॲग्रीकल्चर कडेगाव