मुक्तपीठ टीम
कोरोना महामारीमुळे ऑनलाइन शॉपिंगवर लोकांचा मोठा कल वाढताना दिसत आहे. यामुळे ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे पाहता सध्या सायबर गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हॅकर्स आता वेगवेगळ्या प्रकारे आपल्या युजर्सना आपला बळी बनवत आहेत. ते अॅमेझॉनचा ईमेल वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणारे गुन्हेगार ग्राहकांना अॅमेझॉनने पाठवलेल्या मेलसारखेच मेल पाठवतात. पीडित व्यक्ती त्या ईमेलवर विश्वास ठेवतात, यानंतर त्यांची फसवणूक होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ईमेलमध्ये कॉल करण्यासाठी आणि ऑर्डर रद्द करण्यासाठी फोन नंबर असतो. तो नंबर कंपनीचा नसून हॅकर्सचा आहे. त्या व्यक्तीने त्या क्रमांकावर संपर्क साधताच. तो गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतो. अहवालानुसार, ईमेलमध्ये ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनची लिंक आणि खरेदीच्या पावतीचा मॉकअप देखील आहे.
फसवणूककर्ते मागतात बॅंकेची माहिती
- ईमेलमध्ये महागड्या उत्पादनांसाठी बनावट पावत्या आणि पेमेंट तपशील दाखवले जातात. ज्यामुळे ग्राहकांसाठी ही चिंतेचीबाब आहे.
- व्यक्तीने या नंबरवर कॉल केल्यानंतर, हॅकर उत्तर देत नाहीत. त्यानंतर पीडितेला पुन्हा कॉल करण्यात येतो.
- ऑर्डर रद्द करण्यासाठी गुन्हेगार त्यांना त्यांचे बँक तपशील शेअर करण्यास सांगतात.
- एकदा बँक तपशील दिल्यानंतर पीडित व्यक्ती काहीही करू शकत नाही.
- स्कॅमर सर्व डेटा चोरतात. त्याला बँक खाते आणि इतर महत्त्वाची माहितीही मिळू शकते.
अशा घोटाळ्यांपासून कसे सुरक्षित राहायचे?
- घोटाळेबाज बनावट ईमेल पाठवण्यासाठी जीमेल खाते वापरतात.
- ऍमेझॉनच्या पावत्या सामायिक करण्यासाठी गुन्हेगार जीमेल खाते वापरत नाही.
- त्यामुळे मेलला उत्तर देण्यापूर्वी नेहमी ईमेल आयडी नीट तपासा.
- तुमचे डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग लॉगिन, ओटीपी क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका.
- बँका कधीच आपल्या ग्राहकांना फोनवरून अशी माहिती विचारत नाहीत.