मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात झाली. उत्तरप्रदेश सरकारने दाखल केलेल्या तपास अहवालाबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की आम्हाला ही जबाबदारी स्वतंत्र न्यायाधीशाकडे द्यायची आहे. ते आरोपपत्र दाखल होईपर्यंत रोजच तपासाचा आढावा घेतील. एका खास व्यक्तीला फायदा होण्यासाठी सारं सुरु असल्याचं न्यायाधीशांनी केलेले विधान महत्वाचं मानलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
- लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या स्टेटस रिपोर्टवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
- न्यायालयाने म्हटले आहे की, एसआयटीने आतापर्यंत तेरा आरोपींपैकी केवळ एकाचा फोन जप्त केला आहे.
- यूपी सरकारचे वकील हरीश साळवे म्हणाले की, अनेक आरोपींनी सांगितले आहे की ते फोन वापरत नाहीत.
- सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, प्रथमदर्शनी असे दिसते की एका आरोपीला फायद्यासाठी केले जात आहे.
- (या प्रकरणातील आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला उत्तरप्रदेश सरकार करत असल्याचा आरोप सातत्याने झाला आहे. आताही अप्रत्यक्षरीत्या न्यायालयाचा इशारा आशिषकडे असल्याची शक्यता आहे)
- या प्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यावेळी उत्तरप्रदेश सरकारला तपासासाठीचे नाव न्यायालयाला सांगावे लागेल.
लखीमपूर शेतकरी हत्याकांड कसं घडलं?
- लखीमपूर उत्तरप्रदेशात आहे. स्थानिक खासदार अजय मिश्रा हे केंद्रात मोदी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आहेत.
- रविवारी मिश्रांच्या मतदारसंघात काही कार्यक्रम होते. त्यासाठी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य आले होते.
- त्या दौऱ्याआधी निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना उद्देशून केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यामुळे दौऱ्याच्यावेळी निदर्शने झाली.
- केंद्रीय मंत्रीपदावर असणाऱ्या अजय मिश्रा यांनी “मी फक्त मंत्री-खासदार नाही…लक्षात ठेवा. दहा पंधरा शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. सरळ करून टाकेन” असे धमकावणारे वक्तव्य केले.
- त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचं हेलिकॉप्टर उतरणारं असलेल्या हेलिपॅडचा कब्जा घेण्याचं आंदोलन केलं.
शेतकऱ्यांना कसं चिरडलं?
- आंदोलनानंतर शेतकरी परतत असताना रस्त्यातही ते घोषणा देत चालले होते.
- तेवढ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा ताफा आला.
- मुलगा आशिष मिश्राच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले. चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
- त्यानंतर शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. त्यात चौघांचा बळी गेला.
- त्यानंतर लखीमपूर खेरीतील तणाव प्रचंड वाढला.
- आशिष मिश्राला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न झाले, पण जनप्रक्षोभ, सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली दखल आणि व्हिडीओ पुराव्यांमुळे अखेर त्याला गडाआड करावे लागले.
उत्तरप्रदेशातील शेतकरी हत्याकांड! समजून घ्या शेतकरीविरोधी अमानुषता २० मुद्द्यांमध्ये…