मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात सत्तांतर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे जंगलातून हलवण्यात आलेला मेट्रो कारशेड पुन्हा आरे जंगलातच करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मुंबईतील आरे परिसरात असंतोष भडकला आहे. तिथं भल्या पहाटेपासून जमलेल्या आरे आंदोलकांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावून सांगितलं, “ज्यांना थोडंही डोकं आहे, त्यांना कळेल…मेट्रो कुठेही होऊ शकते, जंगल नाही! जंगल उद्ध्वस्त करू नका!”
आरे आंदोलकांचा जंगल वाचवण्याचा निर्धार!
#SaveAarey Vneed #Aarey d green lungs of Mumbai as wel as d #Metro Alld trolls come 2Aarey today & see 4 yourself why d environmentalists & citizens want 2 protect itDont listen 2d lies of greedypoliticians
@SaveAareyForest @GreenStalin @disharaisingh @zoru75 @tanmay_shinde99 pic.twitter.com/sKSseBiFKk— rups💚 (@rupspp) July 10, 2022
- मुंबईत गेले काही दिवस पावसाची संततधार आहे.
- तरीही सर्व वर्गातील मुंबईकर निसर्गप्रेमी आज आरे जंगलात जमले आहेत.
- या आरे आंदोलकांच्या हातातील विविध फलक सरकारला सुनावणारे आहेत.
- मेट्रो म्हणजे विकास असेल तर तो जंगलाचा विनाश करून नको.
- तुम्ही सत्तेत याल, सत्तेतून जाल, मात्र जंगल कायम राखलं पाहिजे.
डोकं वापरा, मेट्रो हटवा, जंगल वाचवा!
- मुंबईतील आरे जंगल हे मुंबईचं फुफ्फुस आहे, त्याचा बळी घेऊ नका.
- सत्तेत बसलेल्यांनी थोडं तरी डोकं चालवावं.
- मेट्रो प्रकल्प हा कुठेही होऊ शकतो, मात्र जंगल इतर कुठे होऊ शकत नाही.
- झाडांचं पुन्हा कुठेतरी पुनर्रोपण होऊ शकतं, जंगलाचं होऊ शकत नाही.
- पर्यायी जागा उपलब्ध असूनही आरे जंगलातच मेट्रो कार शेड का?
आरे जंगल वाचवण्यासाठी वारकरीही सरसावले!
- आज आषाढीचा दिवस, विठ्ठल दर्शनासाठी वारकरी आतूर असतात.
- पण आज मात्र काही वारकरी, पांडुरंग भक्त हे आरे जंगलात पोहचले.
- त्यांनी तिथं टाळ वाजवत निसर्ग रक्षणासाठी साकडं घातलं.
- त्यांच्यासोबत असलेले बाल वारकरीही ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’ अशा घोषणा देत होते.