मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी भारतात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या तबलिगी जमातीवर सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने या जमातीचा समाजासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. ही जमात म्हणजे दहशतवादाचे प्रवेशद्वार असल्याचेही सौदी अरेबिया सरकारने संबोधले आहे.
बंदी घालताना सौदी सरकार काय म्हणाले?
- सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने तबलिगी जमातीवर बंदी घातली.
- मशिदींना नमाजानंतर तकरीरमध्ये मुसलमानांना तबलिगमध्ये सामील होण्यापासून सावध करण्याचे निर्देश दिले आहेत.
- देशाच्या इस्लामिक व्यवहार मंत्र्यांनी सुन्नी इस्लामिक संघटनेला दहशतवादाचे प्रवेशद्वार म्हणून संबोधले.
- सोशल मीडियावर त्यांनी तबलिग जमातीवर बंदी घालण्याची घोषणा केली.
- तबलिगी जमात समाजासाठी धोका आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
His Excellency the Minister of Islamic Affairs, Dr.#Abdullatif Al_Alsheikh directed the mosques’ preachers and the mosques that held Friday prayer temporary to allocate the next Friday sermon 5/6/1443 H to warn against (the Tablighi and Da’wah group) which is called (Al Ahbab)
— Ministry of Islamic Affairs 🇸🇦 (@Saudi_MoiaEN) December 6, 2021
सौदी अरेबियाच्या या कठोर निर्णयाचा तबलिगी जमातीवर खोलवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतात कोरोना महामारीच्या सुरुवातीला तबलिगी जमातच्या मिरवणुकीबाबत दिल्लीत मोठा गदारोळ झाला होता. मंत्रालयाने ट्विटच्या मालिकेत असे म्हटले आहे की, इस्लामिक व्यवहार मंत्री महामहिम डॉ. अब्दुल्लातीफ अल-अलशेख यांनी मशिदी आणि मौलवींना तकरीरदरम्यान लोकांना तबलीगी जमातमध्ये सामील न होण्याचा इशारा देण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या मशिदींमध्ये शुक्रवारची नमाज तात्पुरती आयोजित केली जाते त्यांच्यासाठी देखील हे लागू होईल.
सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने इशारा देत मे महिन्याच्या नमाजानंतर होणाऱ्या तकरिरमध्ये तबविगविषयी सावध करण्यास सांगितले.
सौदीच्या बंदीनंतर काय घडणार?
- तबलीगी जमातीमुळे भरकणाऱ्या आणि ब्रेनवॉश करणाऱ्या लोकांचा धोका निर्माण होतो, हे सरकारने जाहीर केल्यामुळे आता या जमातील सौदीतील श्रीमंत मुस्लिमांकडून निधी मिळणे अवघड जाईल. कदाचित बंदही होईल.
- सरकारच्या आदेशानंतर आता धार्मिक स्थळ, धार्मिक व्यक्ती लोकांना तबलिगी जमात समाजासाठी धोकादायक आहे, हे सांगू लागतील.
- त्यांच्या ब्रेनवॉशमुळे ती एकप्रकारे दहशतवादाच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे, असे सांगितले गेल्यामुळे मुस्लिम पालक आपल्या मुलांना जमातीपासून दूर ठेवतील.
- सौदी अरेबियामध्ये तबलीगीसह सर्व अशा कडवट गटांशी संबंध ठेवणे बेकायदेशीर ठरले आहे, त्याविषयीही प्रचार केला जाईल.
भारतातील तबलिगीविषयी विचारणेला उत्तर नाही!
- सौदी अरेबियाच्या सरकारने बंदी घातलेल्या संघटनांमध्ये तबलिगी आणि दावा यांचा उल्लेख आहे.
- तबलिगी जमात ही संघटना मुळात भारतात स्थापन झालेली आहे. तिचे प्रमुख मौलाना साज आहेत.
- भारतातील तबलिगी जमात आणि सौदीत बंदी घातलेली तबलिगी जमात ही एकच की सौदीतील वेगळी हे स्पष्ट नाही.
- सौदीने घातलेली बंदी भारतातील तबलिगीवर आहे की नाही, त्याबद्दल एका भारतीय पत्रकाराने ट्विटरवर विचारले असता त्याला कोणतेही उत्तर मिळालेले नाही.