मुक्तपीठ टीम
सौदी अरेबियात आता मशिदींच्या लाऊडस्पीकरचा आवाज आता कमी ठेवावा लागणार आहे. देशाचे सर्वेसर्वा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अजान किंवा इतर प्रसंगी लाऊडस्पीकरचा आवाज हा त्याच्या क्षमतेच्या एकतृतियांश इतकाच असावा असा आदेश दिला आहे. मशिदीच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारीनंतर हा आदेश देण्यात आला आहे.
सौदी अरेबियातील संबंधित विभागाचे मंत्री अब्दुलतिफ अल-शेख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे:
- ज्यांना नमाज अदा करायची आहे, त्यांनी इमामांच्या अजानची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
- इस्लाम धर्मात अजान आणि नमाजसाठी वेळ ठरलेली असते.
- त्यामुळे मोठ्या आवाजात अजानची गरज नाही.
- काही लोक सरकारच्या निर्णयावर टीका करून लोकांना भडकवायचे प्रयत्न करत आहे. परंतु त्यांना त्यात यश मिळणार नाही.
आवाज नियमन निर्णयाचे स्वागत, काहींचा विरोधही!
- सौदी सरकारच्या या निर्णयाचे बहुतांश लोकांनी स्वागत केले आहे.
- सोशल मीडियावर याला ‘भविष्यवेधी निर्णय’ असे म्हटले जात आहे.
- ‘हा निर्णय काहींना पटला नाही आहे, त्यांनी विरोध सुरु केला आहे.
- त्यातील काहींनी सोशल मीडियावर कॅफे आणि रेस्टॅरंटमधील आवाजही कमी करा अशी मागणी करत हॅशटॅग मोहीम सुरू केली आहे.