मुक्तपीठ टीम
तामिळनाडूमध्ये शशिकलांच्या सेवानिवृत्तीची घोषणा झाल्यानंतर अनेक समीकरणे अचानक बदलली आहेत. भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीसाठी तुरूंगातून बाहेर पडलेल्या शशिकला हळूहळू एक आव्हान होत चालल्या होत्या, परंतु अचानक शशिकला यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. गेल्या आठवड्यातील त्यांची ती घोषणा अचानक केली गेली असली तरी त्यामागे काही समीकरणे असल्याची चर्चा आहे.
शशिकला यांना राजकारण संन्यासासाठी राजी करण्यात भाजपच्या काही मोठ्या नेत्यांची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. तामिळनाडूतील राजकीय जाणकारांना त्यामागे राजकीय कारस्थान दिसत आहे.
शशिकला तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचा जुना पक्ष अण्णा द्रमुकने त्यांना पुन्हा पक्षात घेण्यास नकार दिला. त्यानंतर, शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या विद्यमान नेतृत्वाविरोधात शक्तीप्रदर्शनही केली. खरंतर अशा परिस्थितीत अण्णा द्रमुकचे सध्याचे नेतृत्व या निर्णयामुळे सर्वात जास्त खूश झाले पाहिजे होते. परंतु, अण्णा द्रमुक नेत्यांमध्येही शशिकलांच्या या निर्णयाबद्दल संशय आहे.
शशिकलांनी का घेतला संन्यास?
• शशिकला या जयललिता यांच्या सहकारी आणि त्यांच्या वारशाच्या दावेदार आहेत.
• शशिकला थेवर समाजातील आहेत.
• हा समाज अण्णा द्रमुकची जुनी व्होट बँक आहे
• शशिकला यांची थेवर समाजावर चांगला प्रभाव आहे.
• पक्षात शशिकला यांचेही अनेक समर्थक आहेत.
• सध्याच्या परिस्थितीत अण्णा द्रमुकला अँटी इनकंबेंसीचा त्रास होताना दिसत आहे.
• अशा परिस्थितीत जर पक्ष निवडणुकीत हरला तर त्याची जबाबदारी शशिकलांवर आली असती.
• त्यामुळे त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा मार्ग कायमचा बंद झाला असता.
• राजकारण संन्यासानंतर निवडणुकीत कोणाची बाजू घ्यावी या पेचातूनही त्या बाहेर पडल्या आहेत.
द्रमुकलाही धक्का
• शशिकला यांच्या या निर्णयाने द्रमुकलाही धक्का बसला आहे.
• शशिकला यांनी अण्णाद्रमुकच्या सध्याच्या नेतृत्वाला विरोध केला असता तर मतांचे विभाजन झाले असते आणि त्याचा थेट फायदा द्रमुकला झाला असता.
• आता शशिकला शांत झाल्याने अण्णा द्रमुकची मते विभागली जाणार नाहीत.
• त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने या निर्णयामुळे द्रमुकलाही धक्का बसला आहे.
• शशिकला अण्णा द्रमुकच्या नेतृत्त्वावर नाराज आहेत.
• द्रमुकला त्याचा फायदा होण्यात त्यांना रस नाही.
भाजपाला खुश करा
सुरुवातीपासूनच भाजप शशिकला, पलानीसमी आणि पन्निरसेल्वम यांच्या गटात तडजोडीच्या बाजूने होता. करारासाठी भाजपने सर्व पक्षांशी बोलले होते. शशिकला यांच्या निर्णयाबद्दल भाजपनेही आनंद व्यक्त केला आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शशिकला भाजपाला नाराज नाही करणार आहे. त्यांची नाराजी केवळ अण्णा द्रमुकच्या सध्याच्या नेतृत्वावर आहे. अशा परिस्थितीत भाजपशी युती करून अण्णाद्रमुकमधील भूमिकेचा शोध घेऊ शकतात. त्यांनी भाजपशी चांगली चर्चा करुन, त्यांनी अण्णा द्रमुकच्या नेतृत्वात हस्तक्षेप केल्यास भाजपला याचा फायदा होईल, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करेल. निवडणुकीनंतर अण्णाद्रमुकमध्ये नेतृत्वबदल झाल्यास त्या भाजपची मदत घेतील.
अण्णाद्रमुकच्या पराभवानंतर पक्ष ताब्यात घेण्याची रणनीती
• सर्व निवडणुकांच्या सर्वेक्षणात द्रमुकला आघाडीवर दाखवले जात आहे.
• सत्ताधारी अण्णा द्रमुक मागे दिसत आहे.
• अण्णा द्रमुकमध्ये ईपीएस आणि ओपीएस गटबाजीही आहे.
• शशिकला ६ वर्षे निवडणूक लढवू शकत नाही.
• निवडणुकीत अण्णाद्रमुकचा पराभव झाला तर पक्षातील लढाई आणि दुफळी तीव्र होईल.
• अशा परिस्थितीत, शशिकला यांना पक्षाचा मोठा गट त्यांच्या बाजूने ठेवणे सोपे होईल आणि पुन्हा एकदा नियंत्रण त्यांच्या हातात येऊ शकेल.