Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आमदार निलेश लंके, तुम्ही नवे आर.आर. आबा व्हाल! पण अतिप्रसिद्धीचा धोका टाळा!!

May 23, 2021
in featured, सरळस्पष्ट
0
tulsidas bhoite (2)

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

 

कोरोनाची दुसरी लाट उसळली आणि सामान्यांच्याच नाही तर ज्यांच्याकडे काहीही नाही असे नाही, असे म्हटले जाते, अशांपैकीही अनेकांची दाणादाण उडाली. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे आधीच पिचलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण प्रचंड वाढला. लाट म्हणजे काय असते ते खरोखरच अनुभवास येऊ लागले. सामान्यांचे उपचाराअभावी जीव जातील अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली, त्याचवेळी महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक पुढे सरसावले. त्यांनी आपपल्या परीने, आपापल्या विभागात कोरोना सेंटर आणि इतर उपक्रम सुरु केले. त्यामुळे लाखोंना उपचार मिळाले. हजारोंचे प्राण वाचले. त्याचवेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचाही ताण हलका झाला. त्यामुळे अशांचे काम कोरोना संकटात खूपच मोलाचे ठरत आहे. अशांपैकीच एक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके यांचे.

 

मुक्तपीठनं आपल्या चांगल्या बातम्यांच्या गुड न्यूज मॉर्निंगमध्ये खूप आधी आमदार निलेश लंके यांच्या कार्याची दखल घेतली होती. आमदार निलेश लंके यांनी उभारलेले कोरोना सेंटर पारनेर तालुक्यात आहे. तेथे जवळजवळ हजार खाटा आहेत. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात समाजातूनही मदतीचा हात पुढे येत आहे.

 

आमदार निलेश लंके काम करत असेलेले काम माध्यमांमधून, समाजमाध्यमांमधून लोकांसमोर जात आहे. एकही दिवस असा नसावा जेव्हा आमदार निलेश लंकेंची एकही बातमी कुठे आली नसावी. काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमात असताना एक माणसाने त्यांना निलेश लंकेंना देण्यासाठी चेक दिला. अजितदादांनी चेक वाया जाऊ नये म्हणून थेट आमदार लंकेंना फोन लावून फाऊंडेशन की प्रतिष्ठान अशी खात्री करून घेतली. या घटनेचा व्हिडीओही होता. त्यामुळे स्वाभाविकच त्याचीही बातमी झाली.

 

आताही रोजच कोणी ना कोणी आमदार निलेश लंके यांच्या कोरोना सेंटरमध्ये जात असतं. आणि तेथे होत असलेल्या कार्यक्रमांची छायाचित्रं, व्हिडीओ सगळीकडे प्रसारीत होत असतात. मुख्य माध्यमंच नाही तर समाजमाध्यमांमध्येही आमदार निलेश लंके यांना चांगली प्रसिद्धी मिळत असते.

 

पण गेल्या काही दिवसांमध्ये ही प्रसिद्धी जास्तच नाही तर अती होत आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच एक चांगलं काम करणारा आमदार म्हणून आमदार निलेश लंके यांना आपुलकीचा सल्ला देत आहे. पत्रकार सर्वज्ञानी नसतात. पत्रकारांपेक्षा राजकीय नेत्यांना जास्त कळते, असे मत असणाऱ्या पत्रकारांपैकी मी आहे. त्यामुळे मी सांगतो तेच योग्य, त्यांनी ऐकलंच पाहिजे, असा अट्टाहास नाही. पण तरीही एका चांगल्या माणसानं दीर्घकाळ राजकीय आणि सामाजिक जीवनात पुढे जात राहणं आवश्यक असल्याने सांगत आहे.

 

निलेशजी, प्रसिद्धी चांगलीच. मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमीच बजावत असतो. मराठी माणूस सेल्फ मार्केटिंगमध्येच कमी पडतो. उगाच संकोच करतो. तसं असू नये. त्यामुळे आधी प्रतिभा वापरून परिश्रम करा आणि त्याचं श्रेय तुम्हालाच मिळावं, इतर कुणी ते हडपू नये म्हणून सेल्फ मार्केटिंगही करा. पण तसे सांगतानाच अतीही करु नका. डोळ्यात भरेल इतपत नक्कीच करा, पण डोळ्यात खुपेल असा अतिरेक करू नका, असेही आपुलकीनं सांगतो. गेले काही दिवस तुमच्याबद्दलच्या बातम्यांचे विषय डोळ्यात भरण्यापेक्षा डोळ्यात खुपणारे होऊ लागले आहेत. कृपया काळजी घ्या.

 

With Shri.Nilesh Lanke – @NCPspeaks MLA from Parner. The Magic Figure – 145 was called during his roll call. pic.twitter.com/Ik1fh1mWGa

— Supriya Sule (@supriya_sule) November 30, 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठे बळ आहे. शरद पवारांसारखा महानेता आहे. पुढच्या फळीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासारखे नेते आहेत. पण तरीही या पक्षातील हे मोठे नेते सामान्यांचे नेते आहेत, असे वाटत नाहीत एवढे ते मोठे आहेत. त्यात या नेत्यांचा दोष आहे असे नाही. काहीवेळा दुसऱ्या पिढीतील असण्याचाही एक वेगळा तोटा असतो. तो असू शकतो. त्यामुळेच मग आर. आर. पाटील यांच्यासारखा चेहरा पुढे आणला जातो. आर.आर. आबांचे गुण असे होते की राजकारणात असूनही त्यांनी आपलं सामान्यपण जपलं होतं. सामान्यातील सामान्यांनाही ते आपले वाटत असत.

 

With Nilesh Lanke (@LankeMla)
– @NCPspeaks MLA from Parner. He has set up a 1000 Bed COVID Facility. pic.twitter.com/yVyzVJJKMT

— Supriya Sule (@supriya_sule) August 17, 2020

निलेशजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्याकडे आता आर. आर. पाटील आबांची पोकळी भरून काढण्यासाठी पाहतो, तसे प्रयत्न करतो अशीही सध्या चर्चा आहे. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राला सामान्यांना आपला वाटेल असा नेता खरंतर प्रत्येक पक्षात असलाच पाहिजे. पुन्हा त्याचं वलय राज्यभरात असेल तर अधिक चांगलंच. सत्ता असो की विरोध. दोन्हीकडे एक वेगळी सत्ता असते. त्यात सामान्यांना आपलं वाटावं असं कुणी असणं गरजेचंच. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केले तर आनंदच आहे.

 

So Proud of Our MLA – Nilesh Lanke from Parner serving citizens! pic.twitter.com/iHVqP7RNiA

— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2020

पण होत असताना डोळ्यात खुपेल असं जे घडतंय ते बिघडवणारे ठरू शकते. आर.आर.पाटील उर्फ आबांबद्दल माझ्यासारख्या पत्रकारांच्याही मनात एक वेगळी आपुलकी आहे. होय आहे. होती असे लिहिण्यास हात धजावत नाहीत, अशी आपुलकी. राजकारणात बाकी सर्व होतं असतं. करावं लागतं. पण मुंबई परिसरातील सामान्य तरुणांचे जीवन बरबाद करणारा डान्स बारची छम छम बंद केली ती आबांनीच. हजारो कोटींचा धंदा. शेकडो कोटींच्या ऑफर आल्या असतील, पण त्यांनी त्या लाथाडल्या. अगदी मोठ्यांची नाराजी पत्करली पण बंदी घालूनच दाखवली होती. मोठे काम केले त्यांनी.

tulsidas bhoite

एकीकडे कमालीची आपुलकी दुसरीकडे कॅमेरा दिसताच मोहात पडण्याचा अती प्रसिद्धीचा नाद. होय नादच. त्यांचे पद जाण्यासाठीही तो मोहच कारणीभूत ठरला होता. बड़े बड़े नेताओं से ऐसी छोटी गलतियां होते रहती है. पण अशा चुकाच घात करतात. प्रसिद्धी अती वाईटच म्हणतो ते त्यासाठीच. तुम्ही कोरोना सेंटर उभारलं, स्वत: तेथे लक्ष ठेवता, घरच्यांसारखी रुग्णांची काळजी घेता, तिथंपर्यंत योग्य. तुम्हाला अजित पवारांसारख्या नेत्यांकडूनही त्यासाठी चांगली प्रसिद्धी दिली जाते. पक्षाकडून प्रतिमानिर्मितीचे प्रयत्न होत असतील तर तेही योग्यच. पण काही गोष्टी खूपच खुपणाऱ्या आणि तुमचा आणि सामान्यांचा हितचिंतक म्हणून जराही न पटणाऱ्या आहेत. तुम्ही कोरोना सेंटरची देखरेख करण्यासाठी काळजी घेऊन काही मिनिटे फिरणे समजू शकतो. ते आवश्यकही असेल. पण तुम्ही कोरोना सेंटरमध्येच झोपता. तेही मास्क न घालता. काय साध्य करता? कमी मिळते का तुम्हाला प्रसिद्धी? त्यात पुन्हा एका कोरोना सेंटरमधून जर काही हजार बरे करत असाल तर तुम्हाला आदर्श मानणाऱ्या लाखोंसाठी तुम्ही धोका पत्करून घातक आदर्श समोर ठेवत आहात. आताही गेले काही दिवस कोरोना सेंटर म्हणजे जसा लग्नाचा सोहळा सुरु असलेला हॉल असल्यासारखे कार्यक्रम, पाहुणे तेही पुन्हा मास्कविना मिरवताना दिसतात. हे योग्य नाही. यातून तुमच्या हेतूलाही प्रसिद्धीच्या मोहाचा डाग लागेल. काही टपलेलेच असतात. ते त्याच दृष्टीने पाहतील. मांडतील.

 

Nilesh Lanke sleep on floor-11

तुम्ही मागे आमदार निवासात तुमच्या बेडवर झोपलेल्या कार्यकर्त्याची झोप मोडू नये म्हणून जमिनीवर झोपलात. ते छायाचित्र सगळीकडे आले. ते चांगले. त्यात मला गैर वाटत नाही. पण एका जबाबदार आमदाराने कोरोना सेंटरमध्ये झोपणे म्हणजे संसर्गाला आमंत्रण देणे. आणि तेही केवळ स्वत:साठी नाही तर त्यांना मानणाऱ्या लाखोंसाठी. तसेच कोरोना सेंटरमध्ये गर्दी जमवणारे कार्यक्रम घेणेही न पटणारेच. कृपया हे सर्व थांबवा. आर. आर. पाटील होताना एक काळजी नक्कीच घ्या. प्रसिद्धीचा अतिरेक टाळा. मी पत्रकार आहे, तरीही सांगतो. अति प्रसिद्धी चांगली नाही. ती बाधतेच. जी माध्यमं मोठी करतात, तीच प्रसिद्धीच्या मोहात अडकून चूक झाल्यावर लक्ष्य करताना दयामाया दाखवत नसतात.

 

आमदार निलेश लंके आणि त्यांच्यासारख्या महाराष्ट्राच्या उगवत्या नेत्यांना माझा नम्र सल्ला आहे. प्रसिद्धी घ्याच. तुमच्या कामाचे श्रेय तुम्ही घेतलंच पाहिजे. पण प्रसिद्धीच्या नादाला लागू नका. त्या नादाला लागलं की नको त्या विषयांवरही मोह होतो. बातमी घडवली जाऊ लागते. पण अति तिथं माती होतेच होते. प्रसिद्धीच्या नादानं जरा जास्तच लवकर होते. काळजी घ्या.

 

Tulsidas Bhoite 12-20

(तुळशीदास भोईटे हे मुक्तपीठचे संपादक आहेत.)
संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite

 

 

एक आमदार असा…कोरोना संकटात लोकांसाठी, लोकांसोबत!

वाचा:

एक आमदार असा…कोरोना संकटात लोकांसाठी, लोकांसोबत!

 

वाचा:

जलसंपदामंत्री जयंत पाटील आले आणि निलेश लंके झाले भावूक…

 


Tags: nilesh lanker r patilsaral spashtआर.आर.पाटिलकोरोनातुळशीदास भोईटेनिलेश लंकेसरळस्पष्ट
Previous Post

जगाला औषधं पुरवणाऱ्या भारतातच का लसींचा तुटवडा?

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
top 10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!