संतोष शिंदे
कोरोनामुळे प्रत्येक माणूस अडचणीत आला. जवळची खुप माणसं दगावली. वर्षभरात प्रत्येक माणसाची आर्थिक घडी विस्कटली. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणूस हा लॉकडाऊन आणि कोरोना आजारामुळे मेटाकुटीस आला, उध्वस्त झाला. संसार रस्त्यावर आले. सामान्य माणसाला जगणे मुश्कील झालं. मात्र दुसऱ्या बाजूला खाजगी हॉस्पिटल हे कोरोना बाधित रुग्णांना वाढीव बिल आणि लुटण्याचे एक ‘कुरण’ (सावज) निर्माण झालं. कोरोना बाधित प्रत्येक व्यक्तीला खाजगी रुग्णालयात दीड-दोन लाखाची बिलं हातात देण्यात आली, आणि कदाचित एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर पैसे भरल्याशिवाय त्या व्यक्तीची डेड-बॉडी सुद्धा हातात दिली गेली नाही. कुठलाही औषधो उपचार नव्हता त्या काळात पॅरासिटामोल व इतर औषध गोळ्यांवर ज्यांची किंमत पाच -पन्नास -शंभर रुपये होती त्याच्यावर दीड-दोन लाख रुपये करण्यात आली. खाजगी हॉस्पिटल सर्वसामान्य लोकांना लुटण्याचा भ्रष्टाचाराचे सर्वात मोठं केंद्र बनलेलं आहे. यामध्ये मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांची फार मोठी सेटिंग आहे. आमदार मंत्र्यांच्या सत्ताधारी नेत्यांच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा लोकांना सवलती दिल्या नाहीत उलट प्रचंड पैशांची लुबाडणूक करण्यात आली आली. खाजगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः आरोग्य यंत्रणेचा गैरवापर करून धंदा केला.
महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना असतानासुद्धा कोरोना रुग्णांकडून पूर्ण पैसे घेण्यात आले. म्हणजे सामान्य लोकांना खाजगी हॉस्पिटल की कुठलीही सुट सवलत दिलेली नाही. आमच्याकडे अर्थात ‘संभाजी ब्रिगेड’ कडे भरपूर लोकांच्या तक्रारी आल्या. त्यावर आम्ही आवाज उठवला. मात्र खाजगी हाॕस्पिटल, मेडिकल व इतर आरोग्य यंत्रणेने सर्वसामान्य माणसाच्या खिशावर करोडो रुपयाचा दरोडा टाकलेला आह. त्या सर्व बिलांची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे.
पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, ठाणे सोलापूर, अमरावती व इतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बहुतांश सर्व मोठे हॉस्पिटल हे धर्मदाय आयुक्त च्या अंतर्गत नोंदणीकृत आहेत. पुण्यासारख्या शहरात दीनानाथ मंगेशकर, रुबी हॉल, पूना हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल व इतर बहुतांश हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य लोकांसाठी काही बेड (खाटा) राखीव (आरक्षित) ठेवण्याचे शासकीय आदेश आहेत. मात्र मोठे हॉस्पिटल, सर्व खाजगी हॉस्पिटल सरसकट सगळे राखीव बेड हे इतर लोकांना देऊन त्यावर करोडो रुपये कमावले आहेत. सरसकट सर्व रुग्णांना यांनी बुकींग करून वाढवून दिले. त्यामुळे गेल्या वर्षभरातील पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख हॉस्पिटलच्या कोरोना रुग्णांच्या बिलाची महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे अशी मागणी आम्ही आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने करत आहोत. राज्य सरकारने सर्व बिलांची तात्काळ चौकशी करून सर्व हॉस्पिटलवर, व तेथील गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून कठोर शासन झाले पाहिजेत… अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
कोरोना काळ हा संकटाचा काळ होता व आहे. महाराष्ट्रासह देशावर आणि जगावर महामारीच्या रूपाने मोठे संकट आलेले आहे. महाराष्ट्रात फार मोठी महामारी आलेली आहे. बरीच माणसं यामध्ये मृत्युमुखी पावले आहेत. अशा काळात लोकांची लूट करणं किंवा त्यांना संकटात टाकणं ही निव्वळ देशाची केलेली गद्दारी व देशद्रोह आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीं गांभीर्याने घेऊन महाराष्ट्र सरकारने चौकशी करावी.
कोरोना काळात ज्यांच्यावर वाढीव बिले देऊन आर्थिक मानसिक त्रास दिलेला आहे अशा नागरिकांनी आमच्याशी संपर्क करून लेखी तक्रार द्यावी. ज्यांना ज्यांना खाजगी हॉस्पिटल ने लाखो रुपयांना लुटले आहे अशांनी बिला सह संपर्क करावा. तसेच या सर्व काळात काही अनुचित प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास आपण राज्य सरकारकडे पुराव्यासह याबाबत दाद मागू… आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करू…!
लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारला विनंती… ‘कोरोना’ बाधित रुग्णांना खाजगी हॉस्पिटल लाखो रूपये घेऊन लुटत आहेत. सगळ्या बिलांची चौकशी करा… देशद्रोही गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे.
कोरोना रुग्णांची अथवा नातेवाईकांची आर्थिक फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क करावा…
(लेखक संतोष शिंदे हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक आहेत)
(राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या सुचनेवरून पुण्यातील वशाटोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. संतोष शिंदे यांनी हा लेख त्यापूर्वी लिहिला आहे)