मुक्तपीठ टीम
यूट्यूबवरील संसद टीव्हीचे अधिकृत चॅनल बंद केले आहे. यूट्युबच्या कम्युनिटी गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्यामुळे ते बंद करण्यात आले आहे. संसद टीव्हीचे यूट्यूब चॅनल लोकसभा आणि राज्यसभेचे थेट आणि रेकॉर्ड केलेले सत्र दाखवत असे. हॅकिंगमुळे हे सारं घडलं असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘रेडिट’ या सोशल मीडिया वेबसाइटवरील काही यूजर्सनी सोमवारी रात्री उशिरा संसद टीव्हीचे YouTube खाते हॅक झाल्याचा दावा करणारे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ शेअर केले. ट्विटरवरही तसे आले.
संसद टीव्हीचे यूट्यूब खाते बंद
- संसद टीव्हीचे यूट्यूब खाते मंगळवारी सकाळपासून बंद करण्यात आले.
- संसद टीव्हीचे YouTube चॅनल उघडताना ‘404 एरर’ दाखवत आहे.
- तसेच, “This page isn’t available. Sorry about that. Try searching for something else” असा संदेश देखील येथे दिसत आहे.
- संसद टीव्हीच्या चॅनल पेजवर सांगितले जात आहे की, व्हिडिओ उपलब्ध नाही कारण या व्हिडिओशी संबंधित खाते बंद करण्यात आले आहे.
Sansad TV’s YouTube channel has been restored. Viewers can now watch all your favourite programmes on our YouTube platform. pic.twitter.com/CU8nOJa2hj
— SansadTV (@sansad_tv) February 15, 2022
हॅकर्सनी यूट्युब चॅनलचे नाव बदलले
- संसद टीव्हीचे खाते बंद करण्याबाबत यूट्युब चौकशी करत असल्याचे संसद टीव्हीने म्हटले आहे.
- संसद टीव्हीने आपल्या अधिकृत निवेदनात असेही म्हटले आहे की हॅकर्सनी संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलचे नाव बदलून ‘Ethereum’ केले आहे.
- संसद टीव्हीनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत एक निवेदन ट्वीट केले आहे.
- त्यात म्हटले आहे की संसद टीव्हीच्या सोशल मीडिया टीमने ही समस्या सोडवली आहे आणि सेवा पहाटे ०३.४५ पासून पूर्ववत करण्यात आली आहे.
- मात्र, चॅनल अद्याप बंद आहे कारण YouTube त्याच्याशी संबंधित सुरक्षा समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे.
सीईआरटी-इननेही इशारा दिला होता
- सीईआरटी-इनने संसद टीव्हीला हॅकिंगपासून सावध राहण्यासाठी अलर्टही जारी केला होता.
- संसद टीव्हीच्या वृत्तानुसार, यूट्यूब संसद टीव्हीच्या खात्याशी संबंधित हॅकिंग प्रकरणाची चौकशी करत आहे, जेणेकरून ते टाळता येईल.
- YouTube ने सुरक्षा समस्येचे निराकरण केल्यानंतर संसद टीव्ही चॅनेल सेवा पुन्हा सुरू होईल.