मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिसांपासून भाजपाचे नेते आघाडीमधील काही नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप लावत आघाडीचा हा नेता जेलमध्ये जाईल तो नेता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बाजूच्या कोठडीत जाईल असे म्हणत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आता आक्रमक झाले असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन जण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील असं सूचक विधान त्यांनी सोमवारी केलं. मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान शिवसेना भवनात खास पत्रकार परिषद घेत राऊत गौप्यस्फोट करणार आहेत. त्यामुळेच आज संजय राऊत कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांते लक्ष लागून आहे. तसंच संजय राऊत उघडं पाडणार ‘ते’ भाजपाचे ‘साडेतीन’ कोण? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपाचे साडेतीन लोकं देशमुखांच्या कोठडीत असतील…
- जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ.
- केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ.
- हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल.
- देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे.
- पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपाचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील.
- रिपीट, भाजपाचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील.
माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडालीय…
- महाराष्ट्रातही सरकार आहे.
- हे लक्षात घ्या.
- ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे.
- सरकार हे सरकार असतं.
- त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे.
- हमाम में सब नंगे होते है.
- एक मर्यादा असते राजकारणात.
- तुम्ही ती ओलांडली आहे.
- सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे.
- माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे.
- आम्हाला धमक्या देऊ नका.
- आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही.
- मी तर नाहीच नाही.
- एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा.