मुक्तपीठ टीम
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी औरंगबाद दौऱ्यावर असताना त्यांना गुरुवारी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून दर्शन घेतलं. या प्रकारानंतर एमआयएम नेत्यांवर सर्व स्तरावरून टीका होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील अकबरुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला आहे. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे, असे संजय राऊत म्हणाले.
कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल…
- अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले हा काही रितीरिवाज नाही.
- वारंवार संभाजीनगरमध्ये यायचे आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे.
- यामधून अशांतता निर्माण करायची, असे या ओवेसी बंधूंचे राजकारण दिसते.
- मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांना बांधली आहे.
- त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे.
- महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर औरंगजेब २५ वर्षे लढत राहिला.
- तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल.
संजय राऊतांचा इशारा!
- औरंगजेब हा काही महान सुफी संत नव्हता. तो एक आक्रमक होता.
- त्याने महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली.
- याच औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून ओवेसी बंधू आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत.
- आम्ही ओवेसी बंधुंनी दिलेलं आव्हान स्वीकारत आहोत.
- औरंगजेबाच्या भक्तांनाही आम्ही त्याच कबरीत पाठवू.
- महाराष्ट्रातील माती मर्दांची, शुरांची आणि महाराजांची आहे