मुक्तपीठ टीम
शिवसेना नेहमी भाजपाविरोधी आपली प्रखर भूमिका मांडत असते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आघाडी करत सत्तेत आहे. मात्र दिल्ली सोनिया गांधी यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतरही शिवसेना यूपीएत नसून महाराष्ट्रात ती मिनी यूपीएत आहे असे विधान शिवसेना खासदार संजय राऊतांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरु असल्याची चर्चा आहे.
आम्ही अजून यूपीएचा भाग नाही…
- शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, सोनिया यांच्या घरी काल बैठक झाली.
- यावेळी प्रमुख विरोधी नेते होते.
- यावेळी सध्याची राजकीय परिस्थिती, भविष्यात असलेल्या ५ राज्यांच्या निवडणुका यावर प्राथमिक चर्चा झाली.
- काहीही निर्णय झाला नाही.
- सोनियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.
- काही सकारात्मक चर्चा झाल्या.
- आता पुन्हा एक बैठक होणार आहे.
- ममता यांच्याबाबत थोडीफार चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
- २०२४ टार्गेट असेल तर मतभेद का, यावर ते म्हणाले की, आम्ही अजून यूपीएचा भाग नाही.
- एकत्रित काम करतोय. हा मिनी यूपीएचा प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले.
- पुढे ते म्हणाले, देशाची जनता सध्या महागाईच्या वणव्यामध्ये होरपळत आहे.
- मात्र, यावर राज्यसभेत चर्चा होऊ दिली जात नाही.
- यावर संसदेत आज वादळी चर्चा होईल.
आमचे हिंदुत्व पळपुटे नाही…
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल हिंदू व्होट बँकेवरून विधान केले होते.
- यावर संजय राऊतांनी टीका केली आहे.
- सोबतच चंद्रकांत पाटील काय म्हणतात त्यावर भूमिका ठरत नाही.
- बाळासाहेब ठाकरे आणि सावरकर यांनी हिंदुत्व रुजवले. बाळासाहेब एकमेव नेते होते.
- त्यांनी करून दाखवले.
- देशात हिंदू व्होट बँक आहे हा विचार पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला.
- बाकी सगळे पळून गेले.
- आमचे हिंदुत्व पळपुटे नाही.
- आमचे हिंदुत्व राजकारण, निवडणूक यासाठी नाही.
- कुणी व्याख्या बदलली असेल, पण बाळासाहेब यांचे नाव अढळ आहे.
- त्यांनी इतिहासाची पाने चाळली पाहिजेत.