मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शनिवारच्या भाषणाला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी रविवारच्या उत्तरसभेत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्वीट करत त्यांनी ताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
- संजय राऊत यांनी फडणवीसांच्या सभेवर पहिली प्रतिक्रिया ट्वीटर करत दिली आहे.
- उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे.
उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते.
अपघात अटळ आहे.— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
- रविवारच्या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता.
- त्यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, किती विश्वास आहे माझ्यावर त्यांचा.
- लपवायचं काय, आज माझं वजन १०२ किलो आहे.
- जेव्हा बाबरी पाडायला गेलो, तेव्हा माझं वजन १५८ किलो होतं.
- उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल, तर माझं एफएसआय १.५ आहे आणि बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं एफएसआय २.५ होता.
- उद्धव ठाकरे यांना असं वाटतं, माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझं राजकीय वजन कमी होईल.
- मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार.