Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सरकारसाठी शुभसंकेत नाहीत…चाणक्यांनी का दिला आघाडीला इशारा?

March 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sanjay raut

मुक्तपीठ टीम

मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आले आहे. या कारवाईनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. पोलिसांमधील काही अधिकारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मनसुख हिरन प्रकरणावर भाष्य केलं आहे.

  • विरोधी पक्षनेते फडणवीस यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रथमच सूर गवसला. आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ त्यांच्यावर राहिला, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांचं उपरोधिक कौतुक केलं आहे.
  • मात्र, त्याचवेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं आहे.
  • ‘मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात.
  • विरोधी पक्षनेते पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात.
  • हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत,’ अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.
  • ‘फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या.
  • एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली.
  • त्यांचे वकिली चातुर्य वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते.
  • मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते.
  • अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले, पण पुढे काय?,’ असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
  • ‘खून, आत्महत्या, मृत्यू, बलात्कार यावर सत्ताधारी आणि विरोधकांत रणकंदन सुरू आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.
  • मनसुख हिरेन याचा मृत्यू हा खून असल्याचे सांगून विरोधी पक्षाने सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचा बळी मिळवला, पण अन्वय नाईक व मोहन डेलकर या दोन आत्महत्यांसंदर्भात विरोधी पक्ष काहीच मनापासून बोलायला तयार नाही,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
  • ‘एखाद्या खोट्या प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे.
  • पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. पण म्हणून फडणवीसांच्या पोलिसांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन कोणीच करू नये.
  • मनसुख प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?,’ असा सवालही त्यांनी केला आहे.
  • २४ तासांत का ‘एनआयए’ची एन्ट्री
  • ‘मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे.
  • सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी?
  • केंद्रात भाजपचे सरकार असल्यानेच हे घडू शकले!
  • महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे,’ असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
  • मनसुख हिरेन प्रकरणातही असेच घडेल!
  • ‘अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले.
  • काही दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी किणी प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते.

मृत किणी यांचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यात आला होता. ते प्रकरणसुद्धा पोकळ पुराव्यांवरच उभे होते व शेवटी ते कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.


Tags: mansukh hirensanjay rautअर्णब गोस्वामीमनसुख हिरनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीससचिन वाझेसंजय राऊतसंजय राठोड
Previous Post

सचिन वाझे: तपास, वाद आणि आरोप…जाणून घ्या सर्व काही!

Next Post

गुन्हे महत्त्वाचे : 1)विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून माथेफिरु तरुणाने हल्ल्यानंतर स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन हाताची नस कापून घेऊन स्वत:लाही जखमी करुन घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांनी माथेफिरुला सुरक्षित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 2)वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पालघरमधील ३५ वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 3)’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती. 4)लग्नाचे आमिष दाखवून ४५ वर्षीय विधवा महिलेवर पोलिस निरीक्षकाने अत्याचार केला. तिच्याकडील एक लाखाची रोख व दागिने घेऊन निरीक्षक पसार झाला. ही घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. 5)बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे : 1)विरारच्या खाणीवडे गावात एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून माथेफिरु तरुणाने हल्ल्यानंतर स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन हाताची नस कापून घेऊन स्वत:लाही जखमी करुन घेतले आहे. स्थानिक गावकऱ्यांनी माथेफिरुला सुरक्षित पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 2)वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पालघर पोलिसांच्या ऑपरेशन ऑलआऊटमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. पालघरमधील ३५ वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 3)'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमधील आदर्शनगर येथे शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे असे तिचे नाव आहे. ती मूळ काटोल येथील रहिवासी होती. 4)लग्नाचे आमिष दाखवून ४५ वर्षीय विधवा महिलेवर पोलिस निरीक्षकाने अत्याचार केला. तिच्याकडील एक लाखाची रोख व दागिने घेऊन निरीक्षक पसार झाला. ही घटना गिट्टीखदान भागात उघडकीस आली. या घटनेने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. 5)बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाला दोघा भामट्यांनी बोलण्यात गुंतवून त्याच्याजवळ असलेल्या १ लाख रुपयांच्या रक्कमेतील २७,५०० रुपयांच्या नोटा चोरून पलायन केल्याची घटना कळंबोलीतील पंजाब नॅशनल बँकेत शुक्रवारी दुपारी घडली. कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!