मुक्तपीठ टीम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे खऱ्या अर्थानं महामानव! देशातील प्रत्येकाला आपलं मानत त्यांच्यासाठी काही तरी करुन गेलेले अस्सल भारतरत्न. भारतातील महिलांना समानतेचा हक्क. त्यातही हिंदू महिलांना समानतेचे हक्क मिळवून देणारे हिंदू कोड बिल. बाबासाहेब महिलांच्या सक्षमीकरणासाठी कसे प्रयत्नरत होते ते दाखवणारेच. मुंबईच्या गोरेगावमधील भाकर फाऊंडेशनच्या दीपक सोनवणेंनी त्यामुळेच ठरवला एक वेगळा उपक्रम. त्यांनी बाबासाहेबांच्या १३० व्या जयंतीनिमित्त १३० महिलांना एक वर्षभर सॅनिटरी पॅड पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विचाराला अनुसरून भाकर फाऊंडेशनच्या माध्यमातून भिमजयंतीला वेगळी कलाकृती साकारण्यात आली. सायरा शेख, आरती डोईफोडे, चाऊस शेख, आकाश क्षिरसागर आणि बजरंग बाविशे यांनी सॅनिटरी पॅडमधून १३० भिम जयंती या शब्दाक्षरांची कलाकृती साकारली. महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकतेसाठी ती कलाकृती साकारण्यात आली. तसेच पुढील एक वर्षासाठी १३० मुली, असंघटित महिला कामगार व एकल महिलांच्या सॅनिटरी पॅडची जबाबदारी भाकर फाउंडेशनने घेतली आहे. त्याचबरोबर पुढे एक वर्षभर महिलांच्या आरोग्य संदर्भात विविध माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पाहा व्हिडीओ: