रॉबिन डेव्हिडसन
मधुमेह म्हटलं की आजही अनेकांच्या छातीत धस्स होते. त्यातही काहीवेळा दृष्टीवरही परिणाम होतो. पण लेझर सर्जरीद्वारे मधुमेहाच्या रुग्णांना पाय कापण्याच्या दुर्दैवी परिस्थितीतून वाचवणारे तंत्रज्ञान आहे. अशा रुग्णांना वाचवावणारे हे लेसर तंत्रज्ञान आजवर दहा हजार लोकांना शिकवणारे एक डॉक्टर पल्या सांगलीत आहेत. सांगलीतील आदित्य रुग्णालयाच्या डॉ. शरद सावंत यांनी गौरवशाली कामगिरी बजावली आहे.
अतुलनीय अशा या कामगिरीबद्दल सांगलीतील प्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी सर्जन डॉ. शरद सावंत यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे गौरव करण्यात आला आहे. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले कार्य व राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन भाजपचे नेते आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ, आदित्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व महालॅब, मिरज शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने रविवारी विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन पडळकर, खोत यांच्याहस्ते व काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, डॉ. शरद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पडळकर म्हणाले की, पत्रकारांमुळे राजकारण्यांना मोठी मदत मिळत असते. त्याचबरोबर समाजालाही पत्रकारामुळेच न्याय मिळत असतो. अशा या घटकाचे स्वत:कडे व स्वत:च्या कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळेच संघाने आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याहस्ते शाळा श्रीफळ स्मृतिचिन्ह भेट देऊन सावंत यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी आमदार पडळकर यांनी, डॉ. शरद सावंत यांना रात्री अपरात्री उठवले तरीसुद्धा रुग्णांची चांगल्या पद्धतीने सेवा करून त्यांना जीवदान देण्याचे काम करतात याचा अनुभव आपण अनेकदा घेतला आहे असे कौतुक केले.
डॉक्टरांमुळेच समाजातील अनेक लोकांना दिलासा मिळतो असे कौतुकाचे उद्गार आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी माहिती देताना मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर म्हणाले की, डॉ. शरद सावंत यांनी नुकतेच मुंबईत आयोजित कार्यशाळेत जगभरातील १० हजार डॉक्टरांना ऑनलाइन आणि देशातील प्लास्टिक सर्जनना थेट प्रशिक्षण दिले. ही जागतिक कामगिरी असून अशा पद्धतीचे कार्य करणारे डॉक्टर आपल्या सांगली शहरात आहेत याचा शहराला अभिमान असला पाहिजे. जगात मोजक्याच ठिकाणी असलेल्या सुविधा सांगलीत उपलब्ध करून दिल्याबद्दल पत्रकार संघ त्यांचे कौतुक करत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
खोत म्हणाले की, राजकारणीही पत्रकारांप्रमाणे स्वत:च्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष करीत असतात. मलाही माझ्या कुटुंबाकडे फार लक्ष देता आले नाही, याचे दुख आहे, मात्र पत्रकार संघाने असे उपक्रम राबवून कुटुंबाप्रती असलेली काळजी व्यक्त केली आहे. जयश्रीताई पाटील यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
शिबिरात रक्तदाब, ह्रदय तपासणी, ईसीजी, छातीचा एक्स-रे, इको, शुगर, जनरल चेकअप, हाडातील कॅल्शिअमची तपासणी, दंत तपासणी, स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी, व्हेरीकोज व्हेन्सची तपासणी तसेच ४२ प्रकारच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या. महालॅब आणि मिरज सिव्हीलच्या सहकार्याने सीबीसी, थायरॉईड, कॅन्सर मार्कर सर्व प्रकारच्या काविळ, प्लेटलेट्स, हिमोग्लोबिन तपासण्या पार पडल्या.
प्लास्टिक सर्जन डॉ. शरद सावंत, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, बालरोगतज्ञ आशिष गाढवे, जनरल सर्जन डॉ. आकाश शिंदे , स्त्री रोग तज्ञ डॉ. आशा गाजी, जनरल फिजिशियन अर्चना सावंत, मेडिसिन विभाग तज्ञ डॉ. सुशील कुमार पाटील, डॉ. शितल गस्ते, सुमित हुपरीकर, नेताजी घाटगे, उमर गवंडी, आयुब पटेल शिबिरात सहभागी झाले होते.
मिरज शासकीय रुग्णालयाचे समुपदेशक प्रदीप कांबळे, महालॅबच्या तंत्रज्ञ हर्षदा चव्हाण, सौरभ यादव-पाटील, आधार सोसायटीचे प्रकल्प व्यवस्थापक हणमंत कोळेकर, शशिकांत पाटील, आरोग्य शिक्षक नाईक गिड्डे आदींनी तपासणी केली.
मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालक कुलदीप देवकुळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष बलराज पवार, सरचिटणीस प्रवीण शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, कोषाध्यक्ष महादेव केदार, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संपत बर्गे, चंद्रकांत क्षीरसागर, सलीम नदाफ सूर्य कांत कुकडे यांच्यासह के. के. जाधव, प्रमोद जेरे, विकास सूर्यवंशी, घनश्याम नवाथे, विनायक जाधव, नंदू गुरव, कुलदीप देवकुळे, नरेंद्र रानडे, तानाजी जाधव, शैलेश पेटकर, चिंतामणी कुलकर्णी, नामदेव भोसले, दिगंबर शिंदे, महादेव केदार, किशोर जाधव, किरण जाधव, धनंजय पाठक, संतोष भिसे, शरद जाधव, आदित्यराज घोरपडे, आसिफ मुरसल, कुलदीप माने, सरफराज सनदी, शंकर देवकुळे, सुधाकर पाटील, अक्रम शेख, प्रशांत साळुंखे, विजय हुपरीकर यांनी परिश्रम घेतले.
कुटुंबाकडे दुर्लक्ष सदा भाऊंची खंत
पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे आपल्या कुटुंबाकडे नेहमीच दुर्लक्ष होते. पत्रकार संघाने इलाख्यात शिबिर घेऊन सर्वांना चिंतामुक्त केले याचा आनंद आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याने मला वडिलांना गमवावे लागले अशी खंतही सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवताना वडील सोबत प्रचारात होते. त्यांना सहा महिने खोकला दमवत होता मात्र साधा खोकला आहे म्हणून आपण किरकोळ औषधोपचार करत राहिलो पण तो बळावला आणि त्यातून वडलांना कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले. नंतर माझ्या हाती काही राहिले नाही असे खंत आमदार खोत यांनी यावेळी बोलून दाखवली.
Recosma Laser
- ही जगभरातील अत्यंत सुंदर टेक्नॉलॉजी असून वैद्यकीय उपचारांमध्ये एक क्रांतिकारी पाऊल ठरलेला आहे.
- या द्वारे मधुमेह असणाऱ्या रुग्णांचे भाजलेल्या रुग्णांच्या जखमा अतिशय जलद पद्धतीने बरी केल्या जातात.
- जगभरात आणि देशात हे इंडो युरोपियन टेक्नॉलॉजी लेझर फक्त १८ ते २० ठिकाणी उपलब्ध असून पश्चिम महाराष्ट्रात हे तंत्रज्ञान आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली या ठिकाणी उपलब्ध असून सदरहू सेवा लेसर आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर शरद सावंत येत आहेत
त्यांनी हे तंत्रज्ञान रशियामधील मॉस्को या ठिकाणी अवगत केले आहे. - भारतातील नाना विविध डॉक्टर ना हे तंत्रज्ञान ते शिकवत असतात तसेच अनेक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना याचा लाभ ते देतात.