मुक्तपीठ टीम
फेसबुकची मूळ कंपनी मेटा ने संध्या देवनाथन यांची भारतासाठी नवीन प्रमुख आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. संध्या आता अजित मोहनची जागा घेणार आहे. संध्या देवनाथन १ जानेवारी २०२३ रोजी त्यांचं पद स्वीकारतील. अजित मोहन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला राजीनामा दिला आहे.
संध्या देवनाथन यांनी २०२० मध्ये APAC क्षेत्रासाठी गेमिंगचे नेतृत्व केले. त्या मेटामध्ये Women@APAC च्या कार्यकारी प्रायोजक आहेत. देवनाथन प्ले फॉरवर्डसाठी ग्लोबल लीड देखील आहे, गेमिंग मार्केटमध्ये बदल घडवून आणणारा मेटाचा मोठा प्रकल्प आहे. देवनाथन या २०१६ पासून फेसबुक सोबत आहेत आणि सिंगापूर आणि व्हिएतनाममध्ये कंपनीचा व्यवसाय वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अजित मोहन स्नॅपचॅटमध्ये सहभागी होणार आहेत. अजित मोहन यांनी जानेवारी २०१९ मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. मेटाने अलीकडेच ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. लॉकडाऊनबाबत माहिती देताना मेटा सीईओ आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणाले की, मेटाच्या इतिहासातील हा सर्वात कठीण बदल आहे. या कारवाईबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांची माफीही मागितली. झकरबर्गने कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घटती कमाई आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.