मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीच्या आवाहननुसार उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरीमधील शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्रातच बंद पाळला जात आहे. या बंदला भाजप आणि मनसेने विरोध केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तर आघाडीला प्रश्न विचारला आहे, “संसदेत कृषि कायदे मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का”?
संदीप देशपांडेचे आघाडीला खणखणीत प्रश्न
- संसदेत कृषि कायदे मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?
- शिवसेना खासदारांची संसदेत थोबाडं बंद का होती?
- पवारसाहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचे कारण काय?
- आज लॉकडाऊनमुळे लोकांचे कंबरडे मोडले आहे. सणासुदीच्या दिवसात थोडा-बहुत व्यापार होतो. अशा दिवसांत तुम्ही बंद करता आहात?
- हा सरकार पुरस्कृत बंद आहे. पोलीस दादरभर फिरत दुकाने बंद करीत आहेत. ही कुठली पद्धत?