मुक्तपीठ टीम
सॅमसंग यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. स्मार्टफोन ब्रँड सॅमसंग लवकरच एम-सिरीजमधील नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सीने एम-३२ प्राईम एडिशन भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन भारतातील सॅमसंग फोन्सची वाढती मागणी पाहता हा फोन Samsung Galaxy M32 च्या अपग्रेड फेजवर सादर करण्यात आला आहे, जो गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लॉंच झाला होता.
सॅमसंग गॅलेक्सी एम-३२ प्राईम एडिशन फिचर्स आणि किंमत
- सॅमसंग गॅलेक्सीने एम-३२ प्राईम एडिशनमध्ये अॅंड्रॉईड ११ आधारित OneUI 4.1 देण्यात आला आहे.
- फोनमध्ये ६.४-इंचाचा अॅमोल्ड डिस्प्ले आहे, जो इनफिनिटी-यू नॉचसह येतो.
- डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, ८०० नीट्स ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो.
- फोनमध्ये ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेजसह MediaTek Helio G80 प्रोसेसर आहे.
- मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज १टीबीपर्यंत वाढवता येतो.
- सॅमसंगचा हा फोन प्राइम ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
- यात दोन स्टोरेज प्रकार आहेत. त्याच्या ४जीबी रॅमसह ६४ GB स्टोरेजची किंमत ११ हजार ४९९ रुपये
- १२८ जीबी स्टोरेजसह ६ जीबी रॅमची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम-३२ प्राईम एडिशन बॅटरी फिचर्स
फोनसोबत ६ हजार एमएएच बॅटरी उपलब्ध आहे, जी १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह येते. सुरक्षेसाठी फोनला साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळतो. इतर कनेक्टिव्हिटीसाठी, फोन ४ जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅकला सपोर्ट करतो.
आकर्षक फिचर म्हणजे यातील २० मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा!
- या नवीन एडिशनमध्ये चार मागील कॅमेरे आहेत ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सेल आहे, तर दुसरी लेन्स ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल आहे.
- २-२ मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि डेप्थ सेन्सर उपलब्ध आहेत.
- त्याच वेळी, फोनमध्ये २०-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.