Tuesday, March 10, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जनता दलाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

May 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
sanbhajirao kakde

मुक्तपीठ टीम

 

जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी संभाजीराव काकडे यांची ओळख होती. १९७१ साली विधान परिषदेवर पहिल्यांदा त्यांची निवड झाली होती. तर १९७७ मध्ये जनता लाटेत बारामती मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतरही एकदा पोटनिवडणुकीत त्याच मतदार संघातून ते विजयी झाले होते. जनता पक्ष तसेच जनता दलाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले.
शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!

— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2021

जनता दलाचे विद्यमान अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी संभाजीराव काकडे त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना पक्षाचा मार्गदर्शक गेला, अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे.

 

तर नव्या कार्यकर्त्यांना घडविणारे, त्यांना संधी देणारा नेता म्हणजे संभाजीराव काकडे होते, असे प्रदेश जनता दलाचे युवा अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी म्हटले आहे. मुंबई जनता दलाच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनीही आदरांजली वाहिली आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

 

ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनानं पुणे जिल्ह्यानं मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/JwrCD90qLn

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 10, 2021

संभाजीराव काकडे सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.


Tags: ajit pawarpunesambhaji kakdesharad pawarनाथाभाऊ शेवाळे
Previous Post

“भारत सरकारने लसीकरण अ‍ॅपचे संपूर्ण विकेंद्रीकरण करावे” – जयंत पाटील

Next Post

“औरंगाबाद, अमरावती येथील ‘एफसीआय’ ची विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार”

Next Post
raosaheb danave

"औरंगाबाद, अमरावती येथील 'एफसीआय' ची विभागीय कार्यालये तातडीने कार्यान्वित होणार"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!