Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मराठा समाजाने हक्काचे मागितले तर काँग्रेसला राग का येतो?”

भाजपाचे नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा काँग्रेस प्रदेश प्रवक्त्यांना सवाल

May 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
sanjay lakhe patil

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही तर वेळ निघून जाईल असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले तर काँग्रेस पक्षाला सहन झाले नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालविल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचे मागितले तरीही तुम्हाला राग का येतो, असा सवाल भाजपाचे नेते व राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना केला.

 

संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुकांमुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण गमावले. ते पुन्हा मिळविण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेत आहेत आणि समाजाला जागृत करत आहेत, तर त्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांना इतका राग का यावा, हा प्रश्न आहे. चंद्रकांत सर्वसामान्य मराठा लोकांचे दुःख मांडत आहेत. सामान्य मराठ्यांनी त्यांच्या हक्काचेही मागायचे नाही का, याचे उत्तर संजय लाखे पाटील यांनी द्यावे.

 

ते म्हणाले की, मराठा समाज कोरोनाच्या परिस्थितीत आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्यास उत्तर प्रदेशसारखी स्थिती होईल, ही संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केलेली भिती निरर्थक आणि हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यू आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेशसारखी होण्यासाठी येथील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू कमी व्हायला हवेत आणि ते शक्य नाही. महाविकास आघाडीच्या अपयशामुळे कोरोनाच्या बाबतीत उत्तर प्रदेशसह अन्य कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही हे राज्याचे दुर्दैव आहे.

 

राजकीय स्वार्थासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला आहे. असा आरोप करून लाखे पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. अशा रितीने शाहू महाराजांचा वारस असलेल्या छत्रपतींवर कोणीही दबाव टाकू शकत नाही, त्यांना फक्त आवाहन केले जाऊ शकते. अर्थात हे समजायला आधी भाजपाप्रमाणे छत्रपतींचा सन्मान करायला हवा, असा टोला त्यांनी हाणला.

 

मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करावे, भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केली आहे. संपूर्ण पक्ष प्रदेशाध्यक्षांशी सहमत आहे, असे ते म्हणाले.

 


Tags: BJPMaharashtrasambhaji chhatrapatiचंद्रकांत पाटीलमराठा आरक्षणमहाविकास आघाडीसंजय लाखे पाटीलसंभाजी पाटील निलंगेकर
Previous Post

खा. संभाजी छत्रपतींचे तीन पर्याय, नऊ दिवस! नाहीतर किल्ले रायगडावरून आंदोलनाची घोषणा!

Next Post

“सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज”

Next Post
chandrakant patil

"सावरकरांचे सामाजिक समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!