मुक्तपीठ टीम
सध्या मराठा आरक्षणासाठी संयम कायम राखून आक्रमक झालेल्या संभाजी छत्रपतींच्या परिश्रमी वृत्तीची सध्या त्यांच्या सोबत वावरणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. जराही न थकता संभाजी छत्रपती सतत, अविरत सक्रिय राहतात, तर मग आपण का नाही, असा प्रश्नही स्वत: लाच ते विचारू लागलेत. त्यांच्यापैकी एक असणारे मावळे योगेश केदार यांनी संभाजी छत्रपतींचा एक किस्सा कळवला आहे.
योगेश केदारांच्या शब्दात संभाजी छत्रपतींचे सतत अविरत परिश्रम
रयतेच्या सेवेत तत्पर असणारे छत्रपती संभाजीराजे स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्ती साठी तेवढेच सजग असतात. रायगड किल्ला नेहमी चालत चढणारे संभाजीराजे महाराष्ट्राने पाहिले आहेत. रायगड किल्ला चढून जायला सामान्य पने दोन अडीच तास लागतात. परंतु वयाची पन्नाशी पार केलेले संभाजीराजे ५० मिनिटांच्या आत चढून जातात.
महिन्यातील जवळपास २५ दिवस महाराष्ट्रात फिरणारे संभाजीराजे सतत कार्यरत असतात. सोबतचा व्हिडीओ राजेंच्या शारीरिक तंदुरुस्तीचे रहस्य सांगून जातो.
आताचा एक प्रसंग असाच. तुम्ही चर्चा करा. मी थोडं फिरून येतो. असं सांगून राजे दूरवर गेले. आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा करत बसलो. राजे किती कष्ट करत आहेत. दिवसरात्र मेहनत करत आहेत. अविश्रांत महाराष्ट्र फिरून काढत आहेत. मराठा आरक्षण साठी काही दिवसांपूर्वी दौरा केला. लगेच एकही दिवसाची उसंत न घेता कोकणात सिंधुदुर्गला जाऊन किल्ल्याची तौक्ते वादळात झालेली पडझड पाहण्यासाठी भेट आणि बैठका घेतल्या. लगेच दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक सोहळा चे नियोजन ची बैठक घेऊन लगेच मुंबई गाठली. त्यानंतर रायगड ला पोचले, दोन दिवस गडावर राज्याभिषेक सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वतः प्रत्येक काम करत असलेल्या मावळ्यांची जातीने विचारपूस करत असलेले राजे आम्ही पाहिले. सहा तारखेला राज्याभिषेक सोहळा दुपारी आटोपल्यानंतर लगेच पायथ्याला मराठा समाजाच्या राज्य समन्वयकांच्या बैठकीत सहभाग घेतला. तिथून निघून पहाटे आम्ही कोल्हापुरात पोचलो. दुसऱ्या दिवशी लगेच विशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या शेतात पुन्हा बैठका घ्यायला सुरुवात झाली. शिवारण्य असे या अद्भुत सौंदर्याने नटलेल्या जागेचे नाव आहे.
मी पाच सहा वर्षांपासून राजेंचे हे मेहनती स्वरूप पाहतोय. जुने सहकारी सांगतात की राजेंचे असे अथक परिश्रम आम्ही दीड दशके पाहत आहोत!