मुक्तपीठ टीम
पुण्यात मंगला चित्रपटगृहातील हर हर महादेव चित्रपट बंद पाडला. संभाजी ब्रिगेड हर हर महादेव चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव…’ चित्रपट तयार केला आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात…’ हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा. सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर… छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका…! गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येऊ येणार नाही. सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी.
संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, अविनाश अरविंद मोहिते महानगर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे शिवश्री संदीप मनोहर कारेकर सचिव महानगर पुणे नरेश पडवळ संघटक पुणे अमर गजघाटे अध्यक्ष चित्रपट आघाडी पुणे अभिजीत मोरे उपाध्यक्ष चित्रपट आघाडी पुणे
तसेच, अखिल भारतीय मराठा महासंघ संजय पासलकर, संपर्क प्रमुख पश्र्चिम महाराष्ट्र, अजय पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र् प्रदेश, रविंद्र कंक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, सौ. सविताताई बलकवडे कार्याध्यक्ष पुणे शहर महिला, मयुर गुजर सरचिटणीस पुणे शहर, मंगेश साखरे कार्याध्यक्ष पुणे शहर, महेश बांदल, अर्चित बांदल, हर्षवर्धन बांदल… आदी उपस्थित होते. सुबोध भावे, अभिजीत देशपांडे व इतर कलाकारांना संभाजी ब्रिगेड सोडणार नाही.
हर हर महादेव चित्रपटातील कलाकारांना व निर्माता दिग्दर्शक आणि लेखकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यातून प्रशांत धुमाळ यांनी खरा इतिहास समजून सांगत असताना सुद्धा ब्राह्मणी मनोवादी मानसिकता खरा इतिहास समजून घ्यायला तयार नाही म्हणून आता शिवप्रेमी मावळे कार्यकर्ते सरदार व वंशज या सगळ्यांना जोडण्याचं काम संभाजी ब्रिगेडला करावा लागेल