संतोष शिंदे / व्हा अभिव्यक्त!
महाराष्ट्र सरकार कडून (३० नोव्हें.) तिथीनुसार ‘शिवप्रताप दिन’ साजरा करून ‘तारीख – तिथीचा’ वाद निर्माण का करत आहे…
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला. छत्रपतींना संपवण्यासाठी आलेल्या अफजल खान आणि कृष्णा भास्कर कुलकर्णी यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच ठिकाणी संपवलं, हा शौर्याचा इतिहास आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने सुद्धा 363 वा ‘शिवप्रताप दिन’ 10 नोव्हेंबर रोजी साजरा केला. याच दिवशी प्रतापगडावरच अफजल खानाच्या कबरीवरचा सुद्धा अतिक्रमण काढून टाकलं. मग मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर मंत्री मंडळातील सहकारी तिथीनुसार शिवप्रताप दिन का साजरा करत आहे…? हा तारीख तिथीचा वाद सरकारच अधिकृत निर्माण करणार असेल तर हा खोटारडेपणा शिवद्रोहीपणा आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. व विरोध सुध्दा करणार आहे.
हिशोब घेणार…?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तिथी समर्थक आहेत का…? अशा तिथी समर्थक मुख्यमंत्री आणि सरकारचा संभाजी ब्रिगेडच्या 30 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या महामेळाव्यात सरकारचा जाहीर निषेध करून याबाबत तीव्र आणि कठोर भूमिका घेण्यात येणार आहे. कारण सरकार जर तारीख तिथीचा वाद शिवजयंतीला, संभाजी महाराज जयंतीला किंवा शिवप्रताप दिनाला जर निर्माण करत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतले हे सगळे वाद शिवप्रेमी मावळे म्हणून आम्ही आता खपवून घेणार नाही. या उलट ‘आर या पार’ ची लढाई संभाजी ब्रिगेड लढणार आहे.
याबाबत… श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे आदी प्रमुख पदाधिकारी भेटून इथून पुढील आंदोलनासाठी अत्यंत आक्रमक पवित्रा घेणार आहे. महाराजांनी हस्तक्षेप करून हे वाद मिटवावेत आणि नेतृत्व करावं अशी विनंती करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जर तारीख तिथीचा वाद घालणार असतील तर कोशारी, त्रिवेदी अशा वाचाळविरा सारखं व मुख्यमंत्री सुद्धा दोषी आहेत याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निषेध करत आहे.