मुक्तपीठ टीम
‘चिकन मसाला आणि कोल्ड लस्सी’ असे काही टीव्ही शो केलेली सलोनी खन्ना आता दोन वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. पण बातमी तिच्या सीरीजची नाही. तर तिने त्याबाहेर प्रत्यक्ष जीवनात केलेल्या रिअल हिरोईनच्या वर्तनाचे आहे.. सलोनीने ५ मे रोजी विराफ पटेलसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केले आहे. ती आता लग्नात खर्च होऊ शकणाऱ्या रकमेचा मोठा भाग कोरोना रूग्णांना मदतीसाठी वापरणार आहे.
तिने आणि विराफ पटेलने हा निर्णय घेतला. सध्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे लग्न धूम-धडाक्यात साजरे करणे योग्य नाही. तसेच गरजूंना मदतीची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी लग्नाचा खर्च वाचवला. त्यातील मोठा भाग ते आता एका स्वयंसेवी संस्थेला देणार आहेत. त्यातून गरजूंना मदत केली जाईल.
अस्सल हिरोईनसारखी वागली सलोनी…
• वेब सीरीजच्या दुनियेत सलोनी खन्ना प्रसिद्ध आहे.
• तिच्या आई-वडिलांनी नुकतीच कोरोनावर मात केली.
• बहुधा त्यामुळेही तिच्या डोक्यात कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी लग्न खर्च देण्याचे आले असावे.
• मात्र, त्या दोघांनी पहिल्यांदाच असे समाजकार्य केले असे नाही, गेल्या वर्षीही त्यांनी गरजूंना मदत केली होती.
• पंजाबी कुटुंबातील असणाऱ्या सलोनीच्या घरात तिच्या आई-वडिलांच्या लग्नांनंतरच तिचंच पहिलं लग्न. त्यामुळे ते खूप धुधडाक्यात होईल, असे मानले जात होते.
• आता मात्र त्या दोघांनी नोंदणी लग्न करुन एक मोठा आदर्श निर्माण केला आहे.
पाहा व्हिडीओ: