रोहिणी ठोंबरे
रोहिणी ठोंबरे या मुक्तपीठ टीममधील पत्रकार आहेत. पत्रकारितेच्या धकाधकीतही त्या कवितेची आवड जोपासतात.
सहल
आयुष्यातील क्षण जपण्यासाठी एकदा तरी सहल
काढावी,
उंच भरारी घेत त्या क्षणांना जगण्याची हिंमत ठेवावी
सहलीच्या त्या सुंदर क्षणांनी नाते होतील घट्ट,
अनोळखी लोकांशी संबंध होवून जातात अगदी फिट्ट
माणसामाणसांतील मैलीचे कारण ठरते ही सहल,
नात्यांपलीकडे सुद्धा एक जीवन आहे हे शिकवते ही
सहल
म्हणून म्हणते, सहल एकदा तरी काढावी,
आयुष्यातील अनमोल क्षणांची आठवण आपल्या मनात
जपावी