मुक्तपीठ टीम
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओद्वारे नियंत्रित हवाई वितरण प्रणालीच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन यशस्वी झाले आहे. या प्रणालीमुळे विमानातून उंचीवरून सोडलेले सामान सुरक्षितपणे योग्य जागी पोहचवणे शक्य होणार आहे.
या प्रणालीत CADS – 500 चा वापर राम एअर पॅराशूट (RAP) च्या सहज वळवता येण्याजोग्या क्षमतांचा वापर केला जात आहे. त्याचा वापर पूर्वनिर्धारित ठिकाणी ५०० किलोग्रॅम पर्यंतच्या वजनी वस्तूंचे अचूक वितरण करण्यासाठी केला जातो. उड्डाणादरम्यान ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम वापरून दिशा निर्देशांक, उंची आणि हेडिंग सेन्सर यांचे समायोजन करत लक्ष्य स्थानाची माहिती निश्चित केली जाते. कॅड्स, त्याच्या ऑनबोर्ड इलेक्ट्रॉनिक्स युनिटसह, कार्यप्रणालीद्वारे लक्ष्य स्थानाकडे वेपॉईंट नेव्हिगेशन वापरून स्वायत्तपणे उड्डाण मार्गावर चालू शकते.
ड्रॉप झोन, मालपुरा येथे ५००० मीटर उंचीवरून सिस्टम कामगिरीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. AN32 विमानातून पॅरा-ड्रॉप प्रणाली सोडण्यात आली आणि नंतर स्वायत्त मोडमध्ये पूर्वनिश्चित स्थानावर नेण्यात आली. भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या अकरा पॅराट्रूपर्सनी CADS – 500 चा हवेत पाठलाग केला आणि ते एकाच वेळी जमिनीवर उतरले.
आग्रा येथील हवाई वितरण संशोधन आणि विकास आस्थापना म्हणजेच ADRDE यांनी ही प्रात्यक्षिकं आयोजित केली होती. पाचशे किलो क्षमतेच्या नियंत्रित हवाई वितरण प्रणालीच्या CADS – 500 उड्डाण्णांचीं प्रात्यक्षिक झालीत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून ही उड्डाणांची प्रात्यक्षिके आयोजित केली होती.
पाहा व्हिडीओ: