मुक्तपीठ टीम
देशात सध्या अन्न पदार्थांच्या सुरक्षेला कमालीचं महत्व दिले जात आहे. त्यासाठी असलेल्या फुड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. जर योग्य प्रमाणपत्र किंवा नोंदणी नसेल तर अन्न पदार्थ विकताच येणार नाहीत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनेक व्यावसायिकांकडून त्याविरोधात तक्रारी करण्यात येत आहे. पण त्याचवेळी मध्यप्रदेशातील महाकालेश्वर मंदिराने मात्र प्रसादाच्या लाडूंसाठी असलेले सेफ भोग प्रमाणपत्र मिळवले आहे. आता देशभरातील मंदिरांमधील प्रसादासाठी हे प्रमाणपत्र तपासणीनंतर दिले जाईल.
श्री महाकालेश्वर मंदिराचा लाडू लाडू प्रसाद आणि परिसरात उपलब्ध अन्नाची गुणवत्ता प्रमाणित करण्यात आली आहे. श्री महाकालेश्वर मंदिर समितीद्वारे तयार केल्या जाणाऱ्या लाडू प्रसादाला FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया) द्वारे सुरक्षित प्रमाणपत्र देण्यात आले आहे. मोफत अन्न क्षेत्र, लाडू प्रसाद उत्पादन युनिट आणि श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती संचालित अन्न वाटप स्थळाला सुरक्षित भोग स्थळ प्रकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. या तीन ठिकाणांचे दर सहा महिन्यांनी लेखापरीक्षण केले जाईल. म्हणजेच, जर प्रणाली मानकांशी सुसंगत असल्याचे आढळले तरच प्रमाणपत्र दिले जाईल. मंदिर समिती आता लाडू प्रसादाच्या पॅकेटवर विशेष ‘भोग’ टॅग लावू शकणार आहे. देशातील धार्मिक स्थळांवरील स्वच्छ आणि सुरक्षित भोग प्रसाद आणि अन्न पुरवण्यासाठी ‘भोग’ हा टॅग लावला जाणार आहे.
भोग शब्दाचा अर्थ:
भोग हा शब्द इंग्रजीच्या चार अक्षरांनी बनलेला आहे.
बी – ब्लिसफुल
एच – हाइजीनिक
ओ – ऑफरिंग
जी – गॉड
देवाला अर्पण केलेला स्वच्छ प्रसाद. असा ह्या चार अक्षरांचा अर्थ आहे.
भक्तांसाठी प्रसाद…श्रद्धेसह सुरक्षा!
- बाबा महाकाळचे दर्शन घेण्यासाठी दररोज देशभरातून मोठ्या संख्येने भाविक महाकालेश्वर मंदिरात येतात.
- ते नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना वाटण्यासाठी येथून लाडूचा प्रसाद घेऊन जातात.
- ते अन्नक्षेत्रात अन्नही घेतात.
- भोग प्रमाणपत्रामुळे या साऱ्या भक्तांच्या मनात श्रद्धेच्या जोडीला सुरक्षाही वाढणार आहे.