मुक्तपीठ टीम
काँकर कोव्हिड या मोहिमेचा एक भाग म्हणून आयआयएफएल फाउंडेशन ‘काइंडनेस ऑन व्हील्स’ लसीकरण मोहिमेला पाठिंबा देत आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईच्या विविध भागांतील दिव्यांग व्यक्तींना लस दिली जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या घरी सुरक्षित आणि निर्जंतुक ऑटो रिक्षा सेवा पुरली जाणार आहे. या ऑटो रिक्षांचे चालक सहकार्य, सहानुभूतीपूर्ण आणि लस घेतलेले आहे. सुमारे हजार लोकांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.
लस मिळणाऱ्या असलेल्या दिव्यांग व्यक्तींमध्ये अंध, कमी दृष्टी, कमी श्रवणशक्ती असलेले, लोको मोटर अपंगत्व असलेले ऑटिझम व संबंधित डिसऑर्डर असलेले, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रोफी, मल्टीपल सिरोयसिस, वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व (कर्णबधिर- अंध यांचा समावेश) असलेल्यांचा समावेश असेल. कुष्ठरोगातून बरे झालेल्यांनाही या मोहिमेअंतर्गत लस घेता येऊ शकते.
ही मोहीम सोहम फाउंडेशन आणि रिनोव्हेट इंडिया यांच्या भागिदारीत राबवली जाणार आहे. अंमलबजावणी प्रक्रियेत सहा सोप्या पायऱ्यांचा समावेश असेल – प्रकल्पासाठी एसओपी प्रस्थापित करणे, लसीकरण केंद्रांशी नेटवर्किग, ऑटो रिक्षा चालकांचा समावेश, रिक्क्षांचे विभाजन आणि माहिती पुरवणे, लसीकरणासाठी पिक अप अँड ड्रॉप, दैनंदिन देखरेख आणि केलेल्या प्रगतीचा अहवाल देणे.
आयआयएफएल फाउंडेशनच्या संचालक मधू जैन म्हणाल्या, ‘भारतातील बहुतेक दिव्यांग नागरिकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, कारण त्यांना सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करता येत नाही तसेच सातत्यपूर्ण काळजी व मदतीची गरज असते. ही गरज लक्षात घेत आम्ही दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरणाची सोय करत आहोत. या उपक्रमाद्वारे महामारीमुळे व्यवसायात नुकसान सहन कराव्या लागणाऱ्या रिक्षाचालकांनाही मदत होणार आहे. आयआयएफएल फाउंडेशन आपले भागीदार आणि समाजासह सक्रियपणे काम करायला व मिशन काँकर कोरोना पूर्ण करण्यासाठी बांधील आहे.’
Vaccination drive aimed at vaccinating the specially abled individuals (Mumbai).
Individuals affected from blindness, low vision, hearing impairment, loco-motor disability, autism spectrum disorder, cerebral palsy, muscular dystrophy, multiple sclerosis, & multiple disabilities. https://t.co/zXSZcFGXl6 pic.twitter.com/G9EohSM15d
— IIFL_Foundation (@FoundationIifl) June 25, 2021
या उपक्रमाद्वारे आयआयएफएल फाउंडेशनने या महामारीशी लढण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचे पालन केले जाणार आहे. आयआयएफएल फाउंडेशनने ग्रामीण महाराष्ट्र व राजस्थानात १७५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सपुरवले आहेत आणि राजस्थानातील ७ शहरांमध्ये ५०० कोरोना रिलीफ किट्स पुरवले आहेत. फाउंडेशनने या महिन्याच्या सुरुवातीला होली स्पिरिट हॉस्पिटल, मुंबईला सर्व्हो व्हेंटिलेटर मशिन दान केले आहे. समाजातील वंचित वर्गाला सर्वाधिक जाणवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्या येऊ नयेत म्हणून मदत करणे व आजारावर उपचार करणे हे फाउंडेशनचे ध्येय आहे.