मुक्तपीठ टीम
समुद्रामध्ये हायस्पीड बोटी व एलईडीने सुरू असलेली बेकायदेशीर मासेमारी तात्काळ थांबवावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी या मागणींसाठी गेले ५ दिवस दापोली, मंडणगड आणि गुहागर येथील मच्छिमार संघर्ष समितीकडून बेमुदत उपोषण केले जात आहे. या उपोषणा ठिकणी भेट देऊन आमदार सदाभाऊ खोत यांनी मच्छिमारांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
हायस्पीड बोटी व एलईडीने सुरू असलेल्या मासेमारीमुळे अनेक सामान्य कुटुंबातील मासेमारी करणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदरप्रश्नी मंगळवारी शिष्टमंडळ घेऊन राज्यपालांची भेट घेऊन सर्व माहिती त्यांना देणार असल्याचे यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
दरम्यान, या उपोषणाची दखल घेत मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी, एलईडी,अवैध पर्ससीन नेट आणि हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्धात राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा अवैध मासेमारांविरुद्ध मोठ्या दंडात्मक कारवाईची यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. हा कायदा येईपर्यंत अशा घटनांवर तातडीने कडक कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच मच्छिमारांचे सुरू असलेले उपोषण तात्काळ संपविण्याचे आवाहनही शेख यांनी केले आहे.