Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ती’ मर्सिडिझ सचिन वाझेंच्या वापरातील…पांढऱ्या वेशभुषेतील संशयास्पद व्यक्तीही वाझेच!

March 17, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
sachin waze

मुक्तपीठ टीम

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात दररोजच नवनवीन आणि धक्कादायक गौप्यस्फोट होत आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ सापडली. तपासात एक इनोव्हा गाडीही पुढे आली. त्यानंतर एनआयएच्या चौकशीत तिसर्‍या मर्सिडिझ कारचीही माहिती उघड झाली. ती नेमकी कुणाची याचा आता एनआयए शोध घेत होती. तिचा मालक कळला नसला तरी ती वाझेंच्याच वापरातील असल्याचे आता एनआयएने स्पष्ट केले आहे.

आता सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीत नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी पीपीई किट घातलेलं नसून पांढरा कुर्ता पायजामा घातला होता.

सचिन वाझे हे वापरत असलेल्या महागड्या गाडीत चक्क नोटा मोजण्याची मशीन सापडली आहे. जवळपास ५,७५,००० लाखांची रोकड सापडली आहे. वाझेंच्या गाडीत पैसे मोजण्याचं मशीन का ठेवण्यात आलं होतं, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच स्कॉर्पिओची खरी नंबरप्लेट आणि आणखी काही बनावट नंबरप्लेटही या गाडीत सापडल्या आहेत. याशिवाय, मर्सिडीजमध्ये केरोसीनची एक बाटली सापडली आहे ज्याच्या साहाय्याने सचिन वाझे यांनी डोक्यावरील कॅप आणि फेसशिल्ड जाळले होते, अशीही माहिती तपास यंत्रणेने दिली आहे.

अँटिलीया प्रकरणात एनआयए दररोज नवीन खुलासे करत आहे. त्या दिवशी सकाळी ही गाडी पाहण्यासाठी आलेली व्यक्ती सचिन वाझे होते आणि त्यांनी पीपीटी किट नसून कुर्ता – पायजामा घातला होता हे आता उघडकीस आले आहे. सीसीटीव्हीमध्ये काही कळू नये यासाठी त्यांनी पांढरा कुर्ता आणि पायजामा घातला होता. तसेच डोक्याला रूमाल बांधला होता. एवढंच नाहीतर त्यांनी तोंडावर मास्कही लावला होता, त्यामुळे त्यांचे केवळ डोळेच उघडे दिसत होते.सूत्रांच्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या ड्रायव्हरनंच याबाबतची माहिती एनायएला दिलेल्या जबाबात नोंदवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्याविरोधात सापडणारे हे सबळ पुरावे पाहता त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.


Tags: mercedes carmukesh ambaniscorpio carमनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणमर्सिडिझमुकेश अंबानीसचिन वाझेस्कॉर्पिओ कार
Previous Post

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भागवत राय यांच्या ‘पहलवान साहेब’ जीवन चरित्राचे प्रकाशन’

Next Post

नव्या बांधकाम नियमावलीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार

Next Post
EKNATH SHINDE

नव्या बांधकाम नियमावलीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!