Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सचिन वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेचा ‘तो’ आमदार कोण?

March 14, 2021
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Sameet Thakkar Sachin Vaze-1

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्वीट प्रकरणी अटक झालेल्या समीत ठक्कर यांनी सचिन वाझेंबद्दल केलेले ट्विट खळबळ माजवत आहे. त्यात त्यांनी वाझे एका आमदार नेत्याच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ही माहिती एनआयएमधील सुत्रांनी दिल्याचा दावाही ठक्कर यांनी केला आहे. वादग्रस्त प्रकरणातील वाझेंच्या संपर्कातील ‘तो’ आमदार नेता कोण अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

 

समीत ठक्कर हे भाजपाचे कडवट समर्थक म्हणून ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. त्यांना फॉलो करणाऱ्यांमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांचा समावेश आहे. त्यांनी ट्विटरवर दिलेली माहिती ही खळबळ माजवते. शनिवारीही त्यांनी केलेले ट्विट त्याला अपवाद नव्हते.

 

राजकीय कनेक्शन जोडणारे ‘ते’ ट्विट?

एक्स्क्ल्युझिव्ह !!!
एनआयएच्या उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या सीडीआरवरून दिसते की ते मनसुख हिरेन यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील एका नेत्याच्या सतत संपर्कात होते. वाझे आणि ते नेते यांच्यातील टेलीग्रामवर चॅटही आहेत. तो नेता हा विधान परिषदेचा सदस्य आहे, एवढेच मी सांगू शकतो. कारण, मला माझ्या नावावर आणखी एक गुन्हा नकोय. एनआयए चौकशी करीत आहे, त्यांचं कर्तव्य त्यांना करुद्या. मला मिळालेली माहिती मी शेअर केली.

समीत ठक्कर यांचे ट्विट -१

Exclusive !!!

Top NIA sources says that CDR of API Sachin Vaze shows that he was in constant touch with One Maharashtra leader along Mansukh Hiren. Telegram chats are also there between Vaze & that leader.

— Sameet Thakkar (@thakkar_sameet) March 13, 2021

समीत ठक्कर यांचे ट्विट -२

He is sitting MLC only this much I can reveal.

Don’t provoke can’t name him because don’t want one more case in my name. NIA is investigating let them do there job. I shared the information which I got. #JaiHind🇮🇳

— Sameet Thakkar (@thakkar_sameet) March 13, 2021

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर आता समीत ठक्करच्या या ट्विटमुळे स्वाभाविकच खळबळ माजली आहे. वाझेंच्या संपर्कातील विधान परिषदेतील ‘तो’ आमदार कोण? यावर चर्चा सुरु झाली आहे. एनआयएकडे असलेल्या टेलीग्राम चॅटमध्ये जर आक्षेर्पाह काही आढळले तर अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचे राजकीय कनेक्शन निघण्याची शक्यता आहे.

 

नवे ट्विटही वादग्रस्त ठरण्याची शक्यता

 

Terror analogy of Osama was a preemptive counter Strike. #SachinVaze

— Sameet Thakkar (@thakkar_sameet) March 14, 2021

 

 

समीत ठक्कर यांना पंतप्रधान मोदीही फॉलो करतात!

  • समीत ठक्कर हे नागपूरचे आहेत.
  • समीत वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.
  • समीत कडवट हिंदुत्ववादी आणि भाजपा समर्थक मानले जातात.
  • शिवसेना ते भाजपाचे असल्याचा दावा करते, पण भाजपाने ते त्यांचे कार्यकर्ते नसल्याचे स्पष्ट केले आहे.
  • समीत ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतात.
  • त्यांना ट्विटरवर फॉलो करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्री, भाजपा नेते आहेत.
  • समीत ठक्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दोन आक्षेपार्ह ट्विट केले होते.
  • त्यांच्याविरोधात नागपूर आणि मुंबईत दोन गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली होती.

Tags: sachin vazesameet thakkarसचिन वाझेसमीत ठक्कर
Previous Post

कोकण रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटची भरती

Next Post

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post
week goodnews

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!