मुक्तपीठ टीम
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताची स्टार तिरंदाजपटू दीपिका कुमारीने इतिहास रचला आहे. दीपिकाने वैयक्तिक, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीत सुवर्णपदके जिंकली आणि गोल्डन हॅट्रिक केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी दीपिका कुमारीच्या कर्तृत्ववान कामगिरीबद्दल ट्वीट केले आहे. रविवारी दीपिकाने पती अतनु दास यांच्यासह मिश्र सांघित गटात नेदरलँड्सचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. हा पराक्रम गाठण्यासाठी अतनु आणि दीपिकाची ही पहिली जोडी आहे. सचिनने ट्विट करत तिचं कौतुक केलं आहे, “दीपिकाने पॅरिसमध्ये ज्या प्रकारचा खेळ दाखविला आहे, ऑलिम्पिक स्पर्धेत जगाला काय पाहायला मिळणार आहे ते समजले आहे.”
Magnificent performance Deepika! You deserve all the success & recognition.
Your performance at #ArcheryWorldCup in Paris is just a glimpse of what the world shall see at the @Olympics.
Proud of your achievement & wishing you all the very best for the #TokyoOlympics. pic.twitter.com/eexF4snzel
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 28, 2021
सचिन तेंडुलकरने ट्विट करत लिहिले की, ‘दीपिकाची उत्तम कामगिरी. आपण खरोखर हे यश आणि मान्यता पात्र आहात. पॅरिस येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमधील तुमच्या कामगिरीने ऑलिम्पिकमध्ये जग काय पाहणार हे दाखवून दिले. आपल्या यशाचा अभिमान आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या हार्दिक शुभेच्छा. विजयानंतर दीपिकाचे पती अतनु म्हणाले, ‘आम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहोत, मला वाटते म्हणूनच आम्ही लग्न केले. आम्ही केवळ एकमेकांना प्रेरणाच देत नाही तर एकमेकांना प्रोत्साहित करतो आणि एकत्र जिंकतो. रिकर्व्ह वैयक्तिक स्पर्धेत दीपिकाने रशियाच्या एलेना ओसीपोवाचा ६-० असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
दीपिकाने पहिला सेट २९-२७, दुसरा सेट २९-२८ असा जिंकत ४-० अशी आघाडी घेतली आणि तिसर्या सेटमध्ये दीपिकाने २८-२७ असा विजय मिळविला. दीपिकाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मेक्सिकोला ५-१ ने पराभूत करून महिला संघ स्पर्धेत सुवर्ण जिंकले. अतनु आणि दिपिका यांनी हॉलंडची जोडी जेफ व्हॅन डेन बर्ग आणि गॅबी श्लोसरला पराभूत करून विजय मिळविला.