Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना नसतानाही फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही मानकात अधोगती!”

"राज्याच्या जीएसटी उत्पन्नात घट हा दावाही धादांत खोटा!": सचिन सावंत

September 5, 2021
in घडलं-बिघडलं
0
congress- bjp

मुक्तपीठ टीम

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उद्योगस्नेही (Ease of Doing business) मानकात महाराष्ट्र ५ व्या स्थानावर होता हा भाजपा नेते अतुल भातखळकर यांचा दावा हास्यास्पद व वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र २०१५ साली ८ व्या स्थानी, २०१६ साली १० व्या स्थानावर तर २०१८ साली १३ व्या स्थानावर होता. कोरोना नसताना ही अधोगती होती हे विशेष. खोटं बोल पण रेटून बोल यात भाजपा तरबेज असून भातखळकर हे रा. स्व. संघाकडून दिक्षा घेऊन बेफाम खोटं बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचे शिरोमणी आहेत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

 

पत्रकार परिषदेत ही बिनधास्त थापेबाजी करणाऱ्या भाजपाचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात जुलैपेक्षा जीएसटी उत्पन्नात ३७२८ कोटी रुपयांनी घट झाली आहे असे दुसरे धादांत खोटे वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे. प्रत्यक्षात एप्रिलमध्ये राज्याचा जीएसटी १२३५० कोटी रुपये, मे महिन्यात ७९८३ कोटी रुपये, जूनमध्ये ८३४९ कोटी रुपये, जुलैमध्ये ११३८८ कोटी रुपये आणि ऑगस्टमध्ये १२६४४ कोटी रुपये असून या कालावधीत एकूण ५२७१४ कोटी रुपये उत्पन्न झालेले आहे. जुलै महिन्यापेक्षा ऑगस्ट महिन्यात जीएसटी उत्पन्न वाढले आहे.

 

त्यामुळे भातखळकर खोटे बोलत आहेत हे स्पष्ट होते. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्या आल्या कोरोनाच्या संकटाला सामोरे गेले. लॉकडाऊन असतानाही व केंद्र सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नसतानाही राज्याचे अर्थकारण पूर्वपदावर आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. म्हणूनच २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत जितके जीएसटी उत्पन्न मिळाले होते त्यात या वर्षी ६७.२९ टक्के वाढ झाली आहे.

 

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते करत असतात.हे सरकार सत्तेवर आल्यापासून कोरोनासह नैसर्गिक संकटांचा सामना सातत्याने करत असतानाही राज्याच्या विकासाची गती थांबू दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारवर जनतेसह उद्योग क्षेत्राचाही विश्वास आहे. खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाजपा नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत, असेही सावंत म्हणाले.


Tags: BJPdevendra fadanvissachin sawantअतुल भातखळकरदेवेंद्र फडणवीसभाजपामहाविकास आघाडी सरकारसचिन सावंत
Previous Post

“राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते, दहीहंडी-गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?”: राज ठाकरे

Next Post

“कोकणात नैसर्गिक संपत्तीसारखीच बुद्धिमत्ताही! सक्षम शिक्षक चांगले विद्यार्थी घडवतील, तर कोकणाला कोणी रोखू शकणार नाही!”

Next Post
nilesh sambare

“कोकणात नैसर्गिक संपत्तीसारखीच बुद्धिमत्ताही! सक्षम शिक्षक चांगले विद्यार्थी घडवतील, तर कोकणाला कोणी रोखू शकणार नाही!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!