मुक्तपीठ टीम
इंस्टाग्राम असो की अन्य सोशल मीडिया. २००७ बॅचचे आयपीएस अधिकारी सचिन अतुलकर सतत चर्चेत असतात. त्यांची आता मध्यप्रदेशची राजधानी भोपाळचे नवे उपमहानिरीक्षक असणार आहेत. त्यामुळे एवढ्या उच्च पदावर नियुक्त झालेले ते देशातील सर्वात तरुण पोलीस अधिकारी असतील. तसेच अवघ्या २३ वर्षी आयपीएस अधिकारी होण्याचाही विक्रम त्यांनीच प्रस्थापित केला होता. त्यांच्या पोलीस सेवेतील या विक्रमांबरोबच ते सोशल मीडियावर चर्चेच असतात ते त्यांच्या फिटनेसमुळे. त्यांची शरीरयष्टी अशी आहे की बॉलीवूडचे हिरोही त्यांच्यासमोर फिके पडतात.
सर्वाधिक तरुण वयात खूपकाही!
- सचिन अतुलकर सध्या भोपाळमध्ये तैनात आहेत.
- ते वयाच्या २३ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा ते त्यांच्या बॅचमध्ये सर्वात तरुण होते.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची जिथे जिथे नियुक्ती झाली तिथे त्यांना सर्वत्र यंगेस्ट ऑफिसर ही पदवी मिळाली.
- त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत बहुतांश वेळ फिल्ड ड्युटीवरच गेला आहे.
- एसएसपी म्हणून ते मे २०२०पर्यंत उजैनमध्ये क्षेत्रात तैनात होते.
- कोरोनाच्या काळात त्यांची बदली झाली होती. तेव्हापासून ते मुख्यालयात तैनात होते.
इंस्टाग्रामवर तब्बल दहा लाख फॉलोअर्स
सचिन अतुलकर यांच्या नावाने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे अकाउंट्स सापडतील. या अकाऊंटवरून वेगवेगळे फोटो शेअर केले जातात. एकदा त्यांनी सांगितले होते की, माझे व्हेरिफाईड अकाउंट फक्त इंस्टाग्रामवर आहे. इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक लोक मला फॉलो करतात. प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात. एका आठवड्यापूर्वी त्यांनी त्यांच्या अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला होता.
लग्नांच्या प्रस्तावांमुळे इंस्टाग्राम अकाउंटवरील कमेंट्स ऑप्शन बंद!
सचिन अतुलकरचे अजून लग्न झालेले नाही. मुलींमध्ये त्याच्याबद्दलची क्रेझ इतकी आहे की त्या घर सोडून पळून जातात. २०१८ मध्ये पंजाबमधील एक मुलगी लग्नासाठी उज्जैन येथील त्यांच्या कार्यालयात पोहोचली होती. यादरम्यान बराच गदारोळ झाला. त्यानंतर तिला समजावून घरी पाठवण्यात आले. सचिन अतुलकरने त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवरील कमेंटचा पर्याय बंद केला आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले. कमेंट बॉक्समध्ये अशाच आणखी काही कमेंट्स होत्या. व्हॅलेंटाईन वीकमध्ये अशा प्रस्तावांचा महापूर असायचा.
आता अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी
दीड वर्षानंतर सचिन अतुलकर यांना पुन्हा फिल्डवरील ड्युटी मिळाली आहे. भोपाळमध्ये पोलीस आयुक्त प्रणाली लागू झाल्यानंतर ते एडीसीपी झाले आहेत. सचिन अतुलकर बुधवारपासून पदभार स्वीकारणार आहेत. भोपाळच्या लोकांना त्यांच्याकडून खूप आशा आहेत. सचिन अतुलकर यांना पोलीस सेवे व्यतिरिक्त खेळ आणि बॉडी बिल्डिंगची खूप आवड आहे. ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फिटनेसचे फोटो पोस्ट करत असतात.
पाहा व्हिडीओ:
Proud of this young IPS only hope he vl not waste or misuse his post for making huge properties like many other IPS nor he vl do publicity of himself like good for nothing nagare patil