Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

सामनाचा हल्लाबोल…”लसीचं राजकारण करणारे भिडेंच्या भाषेतील गांडूच!”

April 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
maharashtra corona

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाने आज लसीच्या राजकारणावर हल्ला चढवला आहे. सांगलीच्या भिडेंच्या भाषेत बोलायचे तर लसीचे राजकारण करणाऱ्यांना गांडूच म्हणावे लागेल, असे सुनावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवलेला लस उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे, असा टोलाही मारण्यात आला आहे.

 

सामना अग्रलेखातील मुद्दे:

जनतेसाठीच्या लसीवर राजकारण
• महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडलेला असताना, त्यात पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करा असे सांगितले आहे. यामागे राजकारण असल्याचे म्हटले जात आहे.
• महाराष्ट्राच्या जनतेने कधीतरी विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. त्याचे भान राखा, ही सर्व राजकीय भांडणे आहेत, या भांडणात लोकांचे जीव जात आहेत.
• राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे.
• लस ही जनतेसाठी असूनही त्यावर उगाच राजकारण सुरू आहे. असे करणाऱ्यांना भिडे गुरूजींच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावे लागेल.
• पंतप्रधानांचा हा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचे पार्सल घेऊन यावे.
• कोरोनाने लोकांना नकोसे केले आहे, त्यात राजकारण्यांची अजून भर पडलेली आहे.

 

कोरोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर भिडे गुरूजींचे वक्तव्य:
• सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला आहे.
• जे ‘गांडू’ आहेत त्यांना कोरोना होणारच, कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत असा विचार सांगलीच्या या अवलियाने मांडला आहे.
• लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी स्वत:चे उद्योग गुंडाळायला घेतले असतील महाराष्ट्रात व देशात कोरोना अनेक भल्याभल्यांना झाला. म्हणजे जे मेले ते मरायच्याच लायकीचे व ज्यांना कोरोना झाला ते गांडू!
• भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. ‘मास्क वगैरे लावू नका, असे विचारही त्यांनी मांडले.
• भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना गांडू म्हटले त्याऐवजी लसीचे राजकारण करणाऱ्यांना या गांडुगिरीचा फटका मारला असता तर शिवरायांचे नाव राहिले असते.

 

महाराष्ट्रातील कोरोना आणि लसींची स्थिती, आता देशाचे पंतप्रधान काय करणार?
•आज जर प्रभू श्रीराम, विष्णू इतकेच काय, छत्रपती शिवरायांनाही मास्क लावूनच सिंहासनावर बसाते लागले असते.
• कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे, पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही.

 

महाराष्ट्रातील लसींचा तुटवडा:
• महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला आहे.
• यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे.
• महाराष्ट्राची जनता म्हणजे टिनपाट किंवा गांडूची अवलाद असा समज केंद्राने अलीकडच्या काळात करून घेतला असेल तर ते भ्रमात आहेत.
• महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निघृण आहे.

 

हे राज्य मर्दाचेच आहे हे काय भिडे किंवा भाजप पुढाऱ्यांना माहीत नाही?
• संपूर्ण महाराष्ट्रात शिवराय भक्तीचे वारे वाहत असते. त्यामुळे हे राज्य मर्दाचेच आहे हे काय भिडे किंवा भाजप पुढाऱ्यांना माहीत नाही?
• महाराष्ट्राशी आमनेसामने लढण्याची हिंमत नाही, तेव्हा हे असे छळवाद सुरू करायचे.
• केंद्र सरकार महाराष्ट्राला लसपुरवठा करण्याबाबत जो अडेलतट्टपणा करीत आहे.
• तो ‘शिवकाळात झाला असता तर छत्रपती शिवाजीराजे काय किंवा छत्रपती संभाजीराजे काय, महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी दिल्लीवर स्वारी करून पुन्हा रायगडावर परतले असते.
• ‘लसी’च्या बाबतीत सध्याचे दिल्लीश्वर जी मोगलाई चालवत आहेत ती औरंगजेबाच्याही वरताण आहे. पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील पुढारी पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत.
• पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करतात हे दर्दनाक आहे.

 

महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच
• कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे.
• देशात कोरोना लढाईच्या यशाचे श्रेय कालपर्यंत मोदीच घेत होते हैं जावडेकर विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी कोरोनासंदर्भात जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे.
• जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरलेला आहे.
• केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी तर महाराष्ट्राची ‘लसीच्या बाबतीत न्याय्य मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला
• आरोग्यविषयक गंभीर स्थितीत ‘वसुलीबाज’ वगैरे शब्द वापरून राजकारण किती गांडू पद्धतीने सुरू आहे.
• महाराष्ट्रात लसीची आणीबाणी सुरू झाली आहे ती केंद्र सरकारच्या पक्षपाती धोरणाने.

 

भाजपशासित राज्यांना जास्तीत जास्त लस साठा पुरवला गेला आहे.
• उत्तर प्रदेशला ४४ लाख डोस, मध्य प्रदेशला ३३ लाख डोस, गुजरातला १६ लाख, कर्नाटक २३ लाख, हरयाणा २४ लाख, झारखंड २० लाख
• महाराष्ट्राच्या वाटेला रडतखडत कसेबसे १७ लाख डोस आले.
• महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळयात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही.
• महाराष्ट्रात माणसे राहात नाहीत असे केंद्राला वाटते काय?
• महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लोकामध्ये असंतोष भडकवायचा असेल तर कारस्थान कोणाच्या डोक्यात शिजत नसावे ना?

• मुंबईतील ५१ लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत.
• राज्यातील लसीकरण ठप्प होईल अशी चिंताजनक परिस्थिती उद्भवली असताना विरोधी पक्षाने अधिक गांभीर्याने वागण्याची अपेक्षा आहे.
• महाराष्ट्राची जनता त्यांचीही कोणीतरी लागतच आहे. याच जनतेने भाजपचे १०५ आमदार निवडून दिलेच आहेत.
• महाराष्ट्राला दर महिन्याला १.६ कोटी तर आठवडयाला ४० लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे.

 

गुजरातला महाराष्ट्राहून लसींचा पुरवठा जास्त तरीही परिस्थिती गंभीर:
• गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा अर्धी, पण गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसी मिळले.
• तरीही तेथील कोरोना परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अतिगंभीर बनली. असे गुजरात हायकोटनि केले सांगितले.


Tags: corona vaccineMaharashtramuktpeethsaamana
Previous Post

…तर ‘सीरम’ मधून होणारा इतर राज्यांचा लस पुरवठा रोखणार; राजू शेट्टींचा इशारा!

Next Post

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शनिवारचे व्हायरल बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!